शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी शिंदी ग्रामस्थांचे उपोषण

By admin | Updated: July 17, 2017 02:06 IST

महिलांचा उपोषणात सर्वाधिक सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा: शिंदी येथील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी, या मागणीसाठी १५ जुलैपासून शिंदी येथील ग्रामस्थांनी गावातच उपोषण सुरू केले आहे. यामध्ये महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे अवैध दारूची वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे दररोज भांडणतंटे होत आहे. गावामध्ये दारू पिण्यासाठी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महिलांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण नाही. गावातील जातीय सलोखा बिघडून तेढ निर्माण होत आहे. गावामध्ये महिलाच दारू विक्रीचा व्यवसाय करतात. बऱ्याच वेळा दारूबंदीसाठी निवेदने देऊनसुद्धा दारू विक्री बंद झाली नाही. यापूर्वी दारू उत्पादन शुल्क विभाग बुलडाणा येथील कार्यालयामध्ये बारगजे कार्यरत असताना मोर्चा नेऊनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शिंदी येथे ग्रामस्थांनी १५ जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जि.प. सदस्य दिनकरराव देशमुख यांनी उपोषणाला भेट दिली. उपोषणामध्ये रेखा सूर्यवंशी, सुनीता खरात, पार्वती बंगाळे, मिना बेलोडे, वर्षा दळवी, मंदाकिनी गवई, ज्योत्स्ना तोडे, लिलाबाई खंडारे, गुंफाबाई बुरकुल, प्रा. बंगाले, सचिन खंडारे, विलास तोडे, सोपान भांड, अनिल खंडागळे, उकंडा खंडारे, आकाश खंडारे, अक्षय खंडागळे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.