शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

मेहकरात सिंधुताई जाधव कोविड केअर सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:28 IST

रविवारी खासदार प्रतापराव जाधव यांनी १०० बेडच्या सर्व सुविधांनी युक्त अशा या कोविड सेंटरचे उद‌्घाटन केले. यावेळी बोलताना ...

रविवारी खासदार प्रतापराव जाधव यांनी १०० बेडच्या सर्व सुविधांनी युक्त अशा या कोविड सेंटरचे उद‌्घाटन केले. यावेळी बोलताना खासदार जाधव पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रत्येक विभागात कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना सेवा व हिंमत द्यावी. मेहकरमधील या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सर्व सुविधा, वायफाय, योगा शिकविला जाणार आहे. जेवणाची व काढ्याची सोय केली जाणार आहे. आमदार संजय रायमुलकर यावेळी म्हणाले की, मेहकर, लोणार, हिवरा आश्रम येथे कोविड केअर सेंटरला १००-१०० गाद्या आपण दिल्या. तसेच रुग्णांना ड्रायफ्रुट, चांगल्या दर्जाचा नाष्टा दिला जाईल. सर्व कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची गैरसोय होणार नाही. यावेळी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, प्रा. बळिराम मापारी, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस शाम उमाळकर, सभापती माधवराव जाधव, गटनेते संजय जाधव, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, तालुकाप्रमुख सुरेश वाळुकर, राष्ट्रीय कॉग्रेसचे जिल्हा पदाधिकारी गिरिधर पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, तहसीलदार डॉ. संजय गरकल, वैद्यकीय अधीक्षक शाम ठोंबरे, तालुका आरोग्याधिकारी महेंद्र सरपाते, नगर परिषद मुख्याधिकारी सचिन गाडे, कार्यकारी संचालक अजय उमाळकर, उपसभापती बबनराव तुपे, दुर्गाप्रसाद रहाटे, डॉ. सचिन जाधव, सह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी लाहोरकर, प्राचार्य गजानन निकस व सर्व कर्मचारी हजर होते. उपनगराध्यक्ष जयचंद बाठिया यांनी संचालन, तर नगरसेवक विकास जोशी यांनी आभार मानले.

मंत्रिमहोदयांनी केले कौतुक

राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे व गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी १ मे राेजी या कोविड केअर सेंटरला भेट देऊन खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर यांचे कौतुक केले. असाच उपक्रम प्रत्येक लोकप्रतिनिधींनी राबविल्यास शासनावरचा ताण कमी होऊन रुग्णांना मदत होईल, असे मत दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केले़