मलकापूररोड स्थित संभवनाथ जैन मंदिरात मोजक्याच उपस्थितीत पक्शाल पूजन व जन्मकल्याणक पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुशीला बाफणा, कुसूम चोपडा, निर्मला बाफणा, देवीबाई भंसाली, सौ. जैन या विचक्षण जैन महिला मंडळ सभासद यांनी पूजेत सहभाग घेतला. यावेळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक व जैन मंदिर विश्वस्थ राजेश देशलहरा व प्रा. शिरीष जैन उपस्थित होते. दरवर्षी होणारे झेंडावंदन, प्रभातफेरी, शोभायात्रा व विविध कार्यक्रम यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेले आहेत. संपूर्ण जगात, भारतात व महाराष्ट्रात आलेल्या कोरोना साथीच्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रभू महावीर यांना पुन्हा एकदा धर्तीवर जन्म घेण्यासाठी प्रार्थना सर्व जैन धर्मीयांनी केली. कोरोनाशी लढा देणाऱ्या सर्व डाॅक्टर्स, मेडिकल स्टाफ, शासकीय प्रशासकीय कर्मचारी यांना परमेश्वरशक्ती प्रदान करेल, व सर्व करोना रुग्ण लवकर बरे होतील, अशी अपेक्षा या शुभ दिनी व्यक्त करण्यासाठी देशपातळीवर व राज्यपातळी वर ॲानलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जैन समाजातील ज्येष्ठ साधुसंताचे, साध्वीवृंद यांचे श्री महावीर जन्मकल्याणक बाबतीत विशेष ॲानलाइन प्रवचन व पूजन कार्यक्रमाचे आयोजनदेखील मोठ्याप्रमाणात करण्यात आले असल्याची माहिती राजेश देशलहरा यांनी दिली.
सामाजिक उपक्रमातून दिला जगा आणि जगू द्याचा संदेश
भगवान महावीर स्वामीजी जन्म कल्याणक महोत्सवनिमित्त २५ एप्रिल रोजी जैन युवकांनी गोशालांमध्ये ढेप दिली. भटकत्या जनावरांना बिस्कीट, पक्षांना पाणी देऊन जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी जगा आणि जगू द्या, असा संदेश युवकांनी आपल्या सामाजिक उप्रकमातून दिला. यावेळी रोशन मूलचंद कोठारी, चेतन जितेंद्र कोठारी, शुभम राजेश सांखला, शुभम सतीश कोठारी, अक्षय स्वरूपचंद देशलहरा आदी उपस्थित होते.