शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी योजनेला अत्यल्प प्रतिसाद

By admin | Updated: November 14, 2014 00:17 IST

खामगाव तालुक्यातील ४२ हजार पात्र, मात्र केवळ १४८३ शेतक-यांनीच घेतला लाभ.

खामगाव (बुलडाणा): कृषी वीज पंपाची असलेली मोठय़ा प्रमाणात थकबाकी व निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्‍यांची असलेली बिकट आर्थिक परिस्थिती पाह ता वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांसाठी कृषी संजीवनी योजना जाहीर केली हो ती. मात्र ३१ ऑक्टोबर या मुदतअखेर सदर योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांची आकडेवारी कमी असल्याचे दिसून येत आहे. वीज वितरण कंपनीच्या खामगाव उपविभागात ५२ हजाराचे आसपास कृषी जोडणी असून यापैकी तब्बल ४२ हजार ५१२ कृषीपंपधारकांकडे वीज थकबाकी झाली आहे. मात्र या योजने अं तर्गत ३१ ऑक्टोबर या योजनेच्या अखेरपर्यंंत ४२ हजार ५१२ पात्र शेतकर्‍यांपैकी फक्त १४८३ शेतकर्‍यांनी थकबाकीचा भरणा केला. एकूण थकबाकी ७३३९.२३ लाख असताना भरणा फक्त ५७.३६ लाखाचाच झाला आहे. त्यामुळे झालेली वसुली नाहीसारखीच आहे. गतवर्षी सुध्दा परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकर्‍यांचे अतोना त नुकसान झाले होते. त्यामुळे कोठे दुष्काळ तर कोठे दुष्काळसदृश परिस्थिती शासनाकडून सर्वेक्षणानंतर जाहीर करण्यात आली. दुष्काळाच्या निकषानुसार शेतकर्‍यांना इतर योजनांसोबतच थकीत कृषी बिल भरता यावे, कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत शे तकर्‍यांना थकीत रक्कमेवरील व्याजमाफी तसेच बिलातही काही टक्के सूट देण्यात आली. तसेच थकबाकी भरण्यासाठी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान तीन हप्तेवारीत पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र यावर्षी उशीरा झालेला पाऊस त्यामुळे लवकर येणारी उडिद, मूग, तीळ ही पिके शेतकर्‍यांना घेता आली नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. परंतु ऐन सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिक असताना पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे शेंगा परिपक्व होण्याआधीच सोयाबीन वाळल्याने शेतकर्‍यांचा पेरणीचा खर्च सुध्दा निघाला नाही. अशी परिस्थिती असताना शेतकरी कृषी संजीवनी ही चांगली योजना असताना सुध्दा फायदा घेवू शकले नाही. देयक भरण्याबाबत अनास्था होती. त्यामुळे कृषी संजीवनी योजनेचा शेतकर्‍यांना लाभ मिळू शकला नाही.