शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्या मुस्लिमांवरील अन्याय दूर करण्यासाठी मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 23:59 IST

बुलडाणा: आपल्या शेजारी देश म्यानमार  (बर्मा) येथील  रोहिंग्या मुस्लमान व इतर धर्मीयांवर अत्याचार व नरसंहार  सुरू असून, संपूर्ण जग हा अन्याय उघड्या डोळ्याने बघत  आहे. हा अमानवीय अन्याय थांबवण्यासाठी भारत सरकारने  म्यानमार सरकारावर दबाव आणून देश सोडून आलेल्या  रोहिंग्या मुस्लिमांना भारतात राहण्यासाठी योग्य मदत करावी,   या मागणीसाठी शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी  बुलडाणा शहरात  ‘जमीअत उलमा-ए-हिन्द’च्या वतीने  व जिल्हय़ातील  लोणार व मेहकर शहरात मूक मोर्चे काढण्यात आले. 

ठळक मुद्देबुलडाणा, लोणार, मेहकर येथे निघाले मूक मोर्चेमोर्चात हजारो मुस्लीम बांधवांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आपल्या शेजारी देश म्यानमार  (बर्मा) येथील  रोहिंग्या मुस्लमान व इतर धर्मीयांवर अत्याचार व नरसंहार  सुरू असून, संपूर्ण जग हा अन्याय उघड्या डोळ्याने बघत  आहे. हा अमानवीय अन्याय थांबवण्यासाठी भारत सरकारने  म्यानमार सरकारावर दबाव आणून देश सोडून आलेल्या  रोहिंग्या मुस्लिमांना भारतात राहण्यासाठी योग्य मदत करावी,   या मागणीसाठी शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी  बुलडाणा शहरात  ‘जमीअत उलमा-ए-हिन्द’च्या वतीने  व जिल्हय़ातील  लोणार व मेहकर शहरात मूक मोर्चे काढण्यात आले. बुलडाणा जिल्हा जमीअत उलमाच्या नेतृत्वात येथील  इकबाल चौकातून दुपारी ३ वाजता मूक मोर्चास सुरूवात  झाली. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानं तर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद  केले आहे की,   कोणताही धर्म हिंसेचे शिक्षण देत नाही.  आज म्यानमार या देशात राहणार्‍या रोहिंग्या मुस्लीम व इतर  धर्मीय अल्पसंख्याक समाजाचे लहान मुले, महिला व  युवकांची निर्घृणपणे हत्या करण्यात येत असून, त्यांना जिवंत  जाळण्यात येत आहे. त्यामुळे सदर कुटुंबीय कंटाळून आपला  जीव वाचवण्यासाठी देश सोडून शेजारील देशात प्रवेश करी त आहेत. या अन्यायग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी भारत  शासनाने  देशात  येण्यासाठी सहकार्य करावे जेणे करून  शोषित-पीडित रोहिंग्या मुसलमान व इतर लोकांना आपला  जीव वाचवून शांततेत राहता येईल. तसेच भारत सरकारने  आपली नैतिक जबाबदारी समजून आंतरराष्ट्रीय स्तरावर इ तर देशांना सोबत घेऊन म्यानमार सरकारवर दबाव आणावा.  तसेच रोहिंग्या मुसलमानवर होणारे अत्याचार  थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही नमूद केले आहे.   यावेळी  जिल्हा जमीअत उलमाचे सर्व पदाधिकारी व  जिल्हय़ातून आलेले मौलाना, सामाजिक नेते मोठय़ा संख्येने  उपस्थित होते.

मेहकर येथील स्वांतत्र्य मैदानावर जाहीर सभामेहकर: म्यानमार बर्मामध्ये मुस्लीम समाजबांधवांवर अ त्याचार होत असल्याच्या निषेधार्थ १५ सप्टेंबरला हजारो  मुस्लीम महिलांनी अभूतपूर्व ऐतिहासिक मूक मोर्चा काढला.  त्यानंतर स्वातंत्र्य मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली.  यावेळी मोर्चातील महिलांना जनसमुदायाला मार्गदर्शन केले. 

लोणार तहसीलवर मूक मोर्चालोणार : म्यानमार देशातील रोहिंग्या मुस्लीम नागरिकांवर   होणारे अन्याय थांबवावेत, या मागणीसाठी शहर व तालुक्या तील हजारो मुस्लीम बांधवांनी तहसील कार्यालयावर १५ स प्टेंबर रोजी मूक मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार सुरेश  कव्हळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शहरातील  जामा मशीद चौकापासून  दुपारी २.३0 वाजता मूक मोर्चाला  सुरुवात झाली.  मूक मोर्चामध्ये सहभागी नागरिकांच्या हातात  रोहिंग्या मुसलमान पर अत्याचार बंद करो’  या आशयाचे  फलक लक्ष वेधून घेत होते.