शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'सामाजिक न्याय’चे वसतिगृह प्रवेश रखडण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 11:42 IST

Education Sector News : शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाल्यावरच वसतिगृहांत प्रवेश दिला जाईल, अशी माहिती मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने यावर्षी सामाजिक न्याय विभागामार्फत चालणाºया मागासवर्गीय वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सलग दुसºया वर्षीही रखडण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाल्यावरच वसतिगृहांत प्रवेश दिला जाईल, अशी माहिती मिळत आहे.जिल्ह्यात सामाजिक व न्याय विभागामार्फत चालणारे मुला-मुलींची वसतिगृहे आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपºयातून येणाºया विद्यार्थ्यांची सोय शासकीय वसतिगृहात केली जाते. जून महिन्यामध्ये शाळा, महाविद्यालये सुरू होत असल्याने वसतिगृहांचीही प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. वसतिगृहात अनुसूचित जाती जमाती, विजभज, आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्ग, अनाथ व दिव्यांग प्रवगार्तील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांकडून वसतिगृहातच आॅफलाइन अर्ज स्वीकारले जातात. अर्ज स्वीकारल्यानंतर गुणवत्तेप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली जाते, तसेच शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना विभागाच्या वतीने रोख रक्कम दिली जाते. यामुळे या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी गर्दी करतात.मात्र, यावर्षी देशासह राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्याच्या शिक्षण विभागाने संसगार्चा धोका लक्षात घेऊन राज्यातील शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली, तरच या वसतिगृहांत नवीन वर्षात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होते. मात्र, शिक्षण विभागाकडून शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात ठोस निर्णय होत नसल्याने जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील नवीन प्रवेश प्रक्रिया रखडल्याचे चित्र दिसून येत आहे.

...अशी असते प्रकिया  वसतिगृहात सातवी उत्तीर्ण झाल्यावर आठवीच्या मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी वसतिगृहात राहण्याची व्यवस्था असते. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेशासाठी अर्ज करावा लागतो. गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड होते. हे विद्यार्थी बारावीपर्यंत वसतिगृहात राहतात. बारावी पास झाल्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी अनुसूचित जाती, जमाती प्रवगार्तील विद्यार्थी वसतिगृहात राहण्यासाठी अर्ज करू शकतात.   या विद्यार्थ्यांची निवड ही मिळालेल्या गुणांच्या आधारे होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजभज, आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्ग, अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात. यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड जोडावे लागते. हे अर्ज केलेल्या यादीमधून प्रचलित नियमाप्रमाणे मागासवर्गीय प्रवर्ग आणि रिक्त जागा खास बाब यांच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतात.  

टॅग्स :khamgaonखामगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र