अकोला- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे पाटील यांची बुलडाणा जिल्हा निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीने त्यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस समकक्ष दर्जाची जबाबदारी सोपवून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. श्रीकांत पिसे यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच विविध पदांवर काम केले आहे. अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. बुलडाणासारख्या मोठय़ा जिलची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुलडाणा जिल्हा निरीक्षकपदी श्रीकांत पिसे पाटील
By admin | Updated: October 8, 2015 01:37 IST