शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

फाटलेला झेंडा फडकविल्याप्रकरणी शिपायास ‘शो-कॉज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 20:43 IST

वाशिम: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर २७ सप्टेंबर रोजी फाटलेल्या अवस्थेत असलेला तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. दरम्यान, हे गंभीर प्रकरण उजेडात येताच जिल्हा प्रशासनाने तडकाफडकी दखल घेत यास कारणीभूत असलेला शिपाई सुनील धानोरकर यास कारणे दाखवा नोटिस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे२७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर फाटलेल्या अवस्थेत फडकविण्यात आला होता तिरंगा झेंडा प्रकरण उजेडात येताच जिल्हा प्रशासनाने घेतली तडकाफडकी दखल शिपाई सुनील धानोरकर यास कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर २७ सप्टेंबर रोजी फाटलेल्या अवस्थेत असलेला तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. दरम्यान, हे गंभीर प्रकरण उजेडात येताच जिल्हा प्रशासनाने तडकाफडकी दखल घेत यास कारणीभूत असलेला शिपाई सुनील धानोरकर यास कारणे दाखवा नोटिस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.प्रशासकीय कार्यालयांसंदर्भात नियमावलीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर दररोज सकाळी देशाचा सन्मान असलेला तिरंगा झेंडा चढविला जातो. तसेच सायंकाळच्या सुमारास उतरविला जातो. दरम्यान, २७ सप्टेंबरला सुनील धानोरकर या शिपायाने सकाळी चढविलेला झेंडा चक्क फाटलेल्या अवस्थेत असल्याचा प्रकार उजेडात आला. यायोगे तिरंग्याचा अवमान झाल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास येताच वेळेपूर्वीच झेंडा उतरवून चांगल्या स्थितीमधील झेंडा चढविला. त्यामुळे एकाच दिवशी दुसºयांदा अनवधानाने का होईना प्रशासनाकडून नियम तोडण्यात आला. यासंदर्भात वाशिमचे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना छेडले असता, २७ सप्टेंबरला झेंडा चढविण्याची आणि उतरविण्याची जबाबदारी असलेला शिपाई सुनील धानोरकर यास कारणे दाखवा नोटिस बजावली होती, असे सांगून ते म्हणाले, की झेंडा चढविला त्यावेळी तो सुस्थितीत होता; परंतू सुसाट्याच्या वाºयामुळे नंतर तो फाटल्याचा खुलासा शिपाई धानोरकर याने सादर केल्याची माहिती हिंगे यांनी ‘लोकमत’ला दिली.