बुलडाणा, दि. ११- ग्रामीण भागात मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला असून, निवडणूक आयोगातर्फे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६0 जागांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतमोजणी २३ फेब्रुवारीला झाल्यानंतर निकाल घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांद्वारे डिसेंबर महिन्यापासून इच्छुक उमेदवारांकडून मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे, तर शिवसेना, भाजप, काँग्रेस आदी पक्षांद्वारे इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत, तर काही इच्छुकांनी आपल्या सर्कलमध्ये निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे.बुलडाणा जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. शिवसेना, भाजप आदी पक्षांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे पुन्हा जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकार्यांना कठीण परिश्रम घ्यावे लागणार आहेत, तसेच भाजपला सत्ता मिळविण्यासाठी सर्व नेत्यांसह कामाला लागावे लागणार आहे. भाजपसाठी ही निवडणूक सोपी नाही.जिल्हा परिषद मतदार यादी आज होणार प्रसिद्धजिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, जिल्हा परिषद, पंचायत समिती गट व गणनिहाय मतदार यादी तहसील कार्यालयात १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या यादीवर १७ जानेवारीपयर्ंत हरकती दाखल करता येणार आहे. यामध्ये लेखनिकांच्या काही चुका, दुसर्या प्रभागातील मतदार चुकून अंतभरूत झालेले असणे, संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही जिल्हा परिषदच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे आदी हरकतींचा समावेश असणार आहे. अशा स्वरूपाच्या हरकती असल्यास १७ जानेवारी २0१७ पयर्ंत संबंधित तहसील कार्यालय येथे लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.६0 पैकी ३0 जागा महिलांसाठी राखीवजिल्हा परिषदेच्या ५0 टक्के आरक्षणानुसार, ६0 जागांपैकी ३0 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. सर्वसाधारण जागांमध्ये २९ जागांमध्ये १४ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत, तर अनुसूचित जाती प्रवर्गात एकूण १२ जागांमध्ये ६ महिला राखीव आहेत, तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात ३ जागांमध्ये २ महिला राखीव आणि नामाप्र (नागरिकांचा मागास प्रवर्ग) प्रवर्गात एकूण १६ जागांमध्ये ८ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत, त्यामुळे निवडणुकीतील स्पर्धा वाढली आहे.असा आहे निवडणुकीचा कार्यक्रमनामनिर्देशन पत्र दाखल करणे-२७ जानेवारी ते १ फेब्रुवारीनामनिर्देशन अर्ज तपासणी-२ फेब्रुवारीअपील दाखल करणे-५ फेब्रुवारी नामनिर्देशन अर्ज मागे घेणे-७ फेब्रुवारीमतदान केंद्राची यादी घोषित-१0 फेब्रुवारीमतदानाची तारीख-१६ फेब्रुवारीमत मोजणी तारीख-२३ फेब्रुवारी
बिगुल वाजला; बुलडाणा जि.प. च्या ६0 जागांसाठी रस्सीखेच सुरू
By admin | Updated: January 12, 2017 02:15 IST