शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना फटका

By admin | Updated: August 31, 2014 23:50 IST

धोरण स्पष्ट नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात; शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापासून विद्यार्थी वंचित.

खामगाव : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक नाही. यासंदर्भात शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही त्याचे पालन होत नसल्याने, अनेक विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.शासन आदेशानुसार पालकाचे वार्षिक उत्पन्न ४.५0 लक्ष रुपयांच्या र्मयादेत असल्यास, व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यास शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ दिला जातो. ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुट्ठोय राहील, अशा विद्यार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र सरकारने ८ जुलै २0१४ रोजी दिले आहेत; परंतु २0१३-१४ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज भरताना सर्वच विद्यार्थ्यांसाठी उत्त्पन्नाची र्मयादा देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी शासन आदेश गृहित धरून याविषयीची माहिती न भरल्यामुळे त्यांचे अर्ज चुकीचे म्हणून बाद ठरविण्यात आले. त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.शासनाने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी शासकीय पातळीवर होत नसल्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. अनेक विद्यार्थी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही त्यांना यापासून वंचित राहावे लागत आहे.