शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

दुकाने बंद, रस्त्यावर गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:35 IST

काेरोना विषाणू (कोविड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, लागू करण्यात आलेला आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी ...

काेरोना विषाणू (कोविड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, लागू करण्यात आलेला आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात कोविड-१९ चे अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये ३० एप्रिल २०२१ पर्यंत विशेष निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ५ एप्रिल रोजी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ५ एप्रिल ते ३० एप्रिल, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत हा सुधारित आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू आहे. या कालावधीत ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, अनावश्यकरीत्या कोणत्याही नागरिकांनी कारणाशिवाय शहरात व गावात फिरू नये,. या व्यतिरिक्त असलेल्या वेळेत म्हणजेच सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत व शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू राहील. या कालावधीत कोणत्याही नागरिकांनी कारणाशिवाय, विहित परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी, बाहेर, शहरात व गावात फिरू नये, आठवडा अखेर शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत पूर्ण संचारबंदी लागू राहील. संचारबंदी कालावधीमध्ये वैद्यकीय सेवेसह अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. या आदेशानंतर जिल्ह्यात ६ एप्रिल रोजी व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली. परंतु पेट्रोल पंप, अत्यावश्यक सेवा व इतर काही ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून आली. पहिल्याच दिवशी नियमाचे उल्लंघन झाल्याचे पाहावयास मिळाले.

आदेशाबाबत संभ्रम

नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये या नवीन आदेशाबाबत संभ्रम दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता घेणे व गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परंतु नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताना दिसून आले.

धार्मिक स्थळे बंद

सर्व प्रकारची धार्मिक स्थळे ६ एप्रिल रोजी बंद दिसून आले. धार्मिक स्थळी कार्यरत असणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्मचारी, व्यक्ती यांना त्यांची नियमित कामे करण्यास अनुमती आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीस अशा धार्मिक स्थळी येण्यास निर्बंध घालण्यात आलेले आहेत.