बुलडाणा : विदर्भ ऑपथॅलमिक सोसायटीची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे. विदर्भ नेत्र परिषदेच्या २०२१-२२ या वर्षाच्या नवीन कार्यकारिणीचा शपथग्रहण समारंभ १८ एप्रिल रोजी नागपूर येथे ऑनलाईन पार पडला. विदर्भ नेत्र परिषदेच्या सचिवपदी डॉ. शोण चिंचोले यांची निवड करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमावलीनुसार हा कार्यक्रम ऑनलाईन घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी ऑल इंडिया ऑपथॅलमिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. महिपाल सचदेव होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये पद्मश्री डॉ. तात्यारात लहाने होते. विदर्भ नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या मुख्य कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष डॉ. आशिष थुल, सचिव डॉ. शोण चिंचोले यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष डॉ. नितीन उपाध्ये, अध्यक्ष निवड डॉ. प्रवीण व्यवहारे, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र विश्वकर्मा यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नेत्र परिषदेच्या डॉ. रागिनी पारेख व नेत्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. परिक्षीत गोगटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहुल तिवारी, डॉ. कविता डांगरा यांनी केले.