शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख शिंदे फरार!

By admin | Updated: August 20, 2016 02:25 IST

रेल्वे पोलिसात दाखल आहे गुन्हा; तपास कामात प्रतिसाद नाही.

शेगाव,(जि. बुलडाणा), दि. १९ : रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य तथा शेगाव शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिनेश शिंदे हे रेल्वे पोलिसांच्या रेकॉर्डनुसार सध्या फरार आहेत. तीन महिन्यांपूर्वी त्यांच्याविरुद्ध रेल्वे पोलिसांत सरकारी कामात अडथळा व रेल्वे स्थानकावर दादागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.दिनेश लक्ष्मण शिंदे रा. व्यंकटेशनगर शेगाव हे येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या कार्यालयात ९ मे २0१६ रोजी पोहचून स्वत:चा परिचय न देता कार्यालयातील खुर्ची ओढून त्यावर बसले व दादागिरी केली. शिवाय शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी अपराध क्रं.१५३८/२0१६ कलम १४५ (ब) रेल्वे अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला तीन महिन्यांचा कालावधी उलटलेला असताना शिंदे यांना रेल्वे सुरक्षा बलाकडून तपासात मदत करणेकामी तीनवेळा पत्रव्यव्हार केलेला असतानाही त्यांनी रेल्वे पोलिसांना मदत केलेली नाही, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुनील डोंगरे यांनी दिली आहे. शिंदेंची भूमिका ह्यतो मी नव्हेचह्ण!रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर दिनेश शिंदे यांना रेल्वे पोलीस विभागाने नोटीस बजावून पोलीस स्टेशनात हजर राहण्याचे सांगितले होते. यावरून दिनेश शिंदे हे आपल्या वकिलांसोबत ६ जुलै २0१६ रोजी पोहचून ह्यतो मी नव्हेचह्णअशी भूमिका घेत, तुमच्या पोलीस दप्तरातील दिनेश लक्ष्मण शिंदे आपण नसून, मी दिवाकर लक्ष्मण शिंदे असल्याची बाजू मांडली आहे. यावरून पोलिसांनी वृत्तपत्रातील कात्रणे, जाहिरात फलकांवरील मजकुर गोळा करण्याचे काम सुरू केले असून, शिंदे यांची बनवाबनवी पोलिसांच्या लक्षात आली असल्याचे ठाणेदार सुनील डोंगरे यांनी सांगितले आहे.रेल्वे पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्याशी माझा कुठलाही संबंध नाही. याबाबत मी पडताळणी केली आहे. रेल्वे पोलीस माझ्याविरूध्द हेतुपुरस्सरपणे कारवाई करत असतील तर ते चुकीचे आहे.- दिनेश शिंदे, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, शेगाव