शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारुविक्रेत्यांवर धाड

By admin | Updated: June 29, 2016 00:50 IST

खामगाव तालुक्यात सात ठीकाणी अवैधदारू बाळगणा-याविरूद्ध कारवाई.

खामगाव : उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तालुक्यात ७ ठिकाणी अवैधरित्या दारू बाळगणार्‍याविरूध्द मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत १४ हजार ५६0 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.खामगाव तालुक्यात अवैधरित्या गावठी दारूचा महापूर वाहत आहे. अनेक गावातून दारूबंदीची मागणी होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रूपाली दरेकर यांनी मंगळवारी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आवार, हिंगणा, कारेगाव याठिकाणी छापा मारून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. महादेव बन्सीलाल सोळंके रा. आवार यांच्या घरी छापा मारला असता त्यांच्याजवळून ५ लिटर हातभट्टी दारू, १0 लिटर मोहसडवा असा एकुण ६८0 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हिरासिंग जगदेव सोळंके रा. आवार यांच्याकडून पाच लिटर हातभट्टीची दारू २0 लिटर मोहसडवा असा एकुण १0३0 रूपयाचा मुद्देमाल, झामसिंग जगदेव सोळंके रा. आवार यांच्याकडून ५ लिटर हातभट्टी दारू व साहित्य असा ३३0 रूपयाचा मुद्देमाल, सहदेव शंकर सोळंके रा. आवार यांच्या जवळून ५ लिटर हातभट्टी दारू व साहित्य असा एकुण ३३0 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यानंतर हिंगणा कारेगाव येथेही छापा मारण्यात आला. येथे संदीप रामदास जाधव यांच्याकडील २0 लिटर हातभट्टी दारू, २१0 लिटर मोहसडवा व कॅन साहित्य असा ११ हजार ६८0 रूपयाचा मुद्देमाल, मिलींद अशोक जाधव रा. हिंगणा यांच्याजवळून ४ लिटर हातभट्टी दारू, २४0 रूपये किंमती तर शिवदास मेघोजी जाधव यांच्याजवळून ४ लिटर हातभट्टी दारू व साहित्य असा २७0 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामधील संदीप जाधव हा आरोपी फरार होण्यास यशस्वी झाला आहे. इतर ६ जणांविरूध्द खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये कलम ६५ ई खंड ड मदाकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.