श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे स्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११२ व्या जयंती उत्सवानिमित्त २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता संस्थेचे स्वीकृत सदस्य प्राचार्य डॉ.पी.एस. वायाळ यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.व्ही.पाटील, पर्यवेक्षक ए.जी.वानखेडे, सपकाळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. वायाळ यांनी भाऊसाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. २६ डिसेंबर रोजी जयंती उत्सव समारोहानिमित्त विद्यालयातील एमबीबीएस प्रवेशपात्र, इयत्ता १० व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे आजीवन सदस्य विष्णू पाटील, प्राचार्य डॉ.वायाळ, शाळा निरिक्षक पी.व्ही. सुरोशे, मुख्याध्यापक मगर, प्राचार्य के.व्ही.पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संचालन डॉ.अनंतकुमार चेके तर आभार ए.जी.वानखेडे यांनी मानले.
शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST