शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळांचा वन्यजीव विभागाच्या कर्मचा-यांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:54 IST

ज्ञानगंगा अभयारण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात मेंढा चारणाºया मेंढपाळांना वन विभागाच्या कर्मचा-यांनी मनाई केली असता, मेंढपाळांनी त्यांच्यावर काठीने हल्ला केला.

ठळक मुद्दे ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना: तीन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ज्ञानगंगा अभयारण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात मेंढा चारणाºया मेंढपाळांना वन विभागाच्या कर्मचाºयांनी मनाई केली असता, मेंढपाळांनी त्यांच्यावर काठीने हल्ला केला. यामध्ये तीन कर्मचारी जखमी झाले. ही घटना अभयारण्याच्या चिंचखेड बिटमध्ये गुरुवारी घडली. या प्रकरणी तीन मेंढपाळांना गुरुवारी रात्री अटक केली.ज्ञानगंगा अभयारण्याच्या सुरक्षेसाठी मेळघाट येथून ‘विशेष टायगर प्रोटेक्शन फोर्स’(एसटीपीएफ) चे काही कर्मचाºयांना ज्ञानगंगा अभयारण्यात पाठवले आहे. एसटीपीएफचे कर्मचारी पूर्णवेळ अभयारण्यामध्ये गस्त घालतात. दरम्यान, २७ जुलै रोजी दुपारी १ वाजता खामगाव अंतर्गत येणाºया चिंचखेड बिट कंपार्टमेंट नं. २६९ मध्ये वन रक्षक संतोष रामकृष्ण शिंदे यांच्यासह एसटीपीएफ दलाचे सहा कर्मचारी गस्त घालीत असताना काही मेंढपाळ जवळपास ४०० मेंढ्या अभयारण्यात चारत असताना आढळून आले. मेंढपाळांना वनरक्षक शिंदे यांनी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये मेंढ्या चारण्यासाठी अडवले. तेव्हा मेंढपाळांनी काठीने वन कर्मचाºयांवर हल्ला केला. यामध्ये वनरक्षक संतोष शिंदे यांच्यासह एसटीपीएफचे विलास दारशिंबे, सरिता दाशिंबे व चंदा भिलावेकर जखमी झाले.सदर घटनेची माहिती मिळताच वन्य जीव विभागाचेअकोला व अमरावती येथील अधिकारी घटनास्थळी पोहचले. जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, वनरक्षक संतोष रामकृष्ण शिंदे यांच्या तक्रारीवरून पिंपळगावराजा पोलीस स्टेशनला आरोपी मेंढपाळ चिमा रामा करंडे, सीताराम पिराजी बोरकर, कैलास त्र्यंबक शिंगाडे, श्याम चिमा कारडे, साहेबराव पिराजी बोरकर, गजानन उमा केसरकर, पुंडलिक सालीबा टाले तथा अन्य एका आरोपीविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४८, १४९, ३५३, ३३२, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच वन विभागाने आरोपींविरुद्ध वनसुरक्षा अधिनियम गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री आरोपी चिमा कारंडे, सीताराम बोरकर व कैलास शिंगाडे या तीन जणांना अटक केली आहे.