शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेगावातील लॉजवर पुन्हा धाडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:04 IST

शेगाव : ओळख लपवून लॉजमध्ये राहत असलेल्या  महिलेसह १२ युवक आणि ११ युवतींना पोलिसांनी रविवारी  दुपारी  ताब्यात घेतले. आठवडाभरापूर्वीच अपर पोलीस  अधीक्षक श्याम घुगे यांच्या पथकाने गेल्या आठवड्यात  धाडसी कारवाई केली होती.  त्यानंतर रविवारी उपविभागीय  पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी धाड टाकली असता  काही लॉजवर युवक आणि युवती संशयास्पद आढळून  आले. 

ठळक मुद्देपोलिसांची कारवाई १२ युवक, ११ युवती, महिला ताब्यातआठवडाभरात दुसरी कारवाई!

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : ओळख लपवून लॉजमध्ये राहत असलेल्या  महिलेसह १२ युवक आणि ११ युवतींना पोलिसांनी रविवारी  दुपारी  ताब्यात घेतले. आठवडाभरापूर्वीच अपर पोलीस  अधीक्षक श्याम घुगे यांच्या पथकाने गेल्या आठवड्यात  धाडसी कारवाई केली होती.  त्यानंतर रविवारी उपविभागीय  पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी धाड टाकली असता  काही लॉजवर युवक आणि युवती संशयास्पद आढळून  आले. १६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीला पोलिसांकडून शेगाव येथील  लॉजवर मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यात आली होती.  यावेळी आठ लॉजवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ५0  ते ६0 युवक-युवतींना पकडण्यात आले. यापैकी २८  जणांवर कलम ११0, ११७ अंतर्गत कारवाई करण्यात आली  होती, तर २५ ते ३0 युवक-युवतींना समजपत्र देऊन  सोडण्यात आले होते. त्याचवेळी परिसरातील गोपाल गेस्ट  हाउसवर पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.  यामध्ये संजय मोहड, गोपाल उमाळे रा.शेगाव तसेच चिखली  येथील एका महिलेचा समावेश होता. रविवारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या  पथकाने पुन्हा शेगाव येथील काही लॉजवर छापा टाकला.  यामध्ये १२ युवक, ११ युवतीसह एका महिलेला ताब्यात  घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात  आली. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप  पाटील, पीएसआय निखिल फटिंग, पीएसआय भास्कर  तायडे, पीएसआय अजहर शेख, पोहेकाँ मिरगे, पोहेकाँ  खुटाफळे यांच्यासह शेगाव शहर आणि ग्रामीण पोलिसांचा  समावेश होता. 

आठवडाभरात दुसरी कारवाई!शेगाव येथे आठवडाभरापूर्वी करण्यात आलेल्या धाडसी  कारवाईनंतर रविवारी पुन्हा पोलिसांनी धाडी टाकल्याने  अनेक लॉजमध्ये तारांबळ उडाली होती. दरम्यान, ओळख  लपवून राहत असल्याने पोलिसांनी २४ जणांना ताब्यात घे तले. या कारवाईमुळे शेगाव शहरात खळबळ उडाली आहे.