शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शांती महोत्सवाला शतकाची परंपरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:15 IST

खामगाव: शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी  देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात ये तो.  कोजागरी पौर्णिमेपासून ११ दिवस चालणार्‍या या महोत्सवा त विविध राज्यातून भाविक  खामगाव येथे दाखल होत  असल्याने, या उत्सवाचे महत्त्व १0९ वर्षानंतरदेखील अबाधित  आहे.

ठळक मुद्देदेशात केवळ खामगावात होते जगदंबेची स्थापनादर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविकांची उपस्थिती!

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी  देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात ये तो.  कोजागरी पौर्णिमेपासून ११ दिवस चालणार्‍या या महोत्सवा त विविध राज्यातून भाविक  खामगाव येथे दाखल होत  असल्याने, या उत्सवाचे महत्त्व १0९ वर्षानंतरदेखील अबाधित  आहे.  या उत्सवात जगदंबा म्हणजेच मोठी देवीची कोजागिरी  पौर्णिमेस मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. या दिवसापासूनच  पुढील अकरा दिवस हा उत्सव चालतो. विजयादशमीला  असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर, देवीचा चेहरा  क्रोधीत असल्याने लाल झालेला असतो. त्यामुळे  म्हणून या  देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो. तसेच देवीला शांत  करण्याकरिता पूजा, अर्चना, आराधना केली जाते. त्या उ त्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते. जंगदबा उत्सव, मोठी  देवी उत्सव केवळ खामगावातच साजरा होत असल्याने, या उ त्सवाला वेगळे महत्त्व असून एक वेगळीच परंपरा हा उत्सव  राखून आहे. नवसाला पावणारी म्हणून अख्ख्या भारतात जिची  ख्याती आहे, त्याच जगदंबेला खामगाव येथे मोठय़ा सन्मानाने  मोठी देवी म्हणून संबोधण्यात येते.  दरम्यान, श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने शहरा तील जलालपुरा भागात अनेक वर्षापासून तर खामगाव शहरात  सन १९0८ पासून  साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव आता  खामगाव शहर आणि परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी  उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. आंध्रप्रदेशात  निजामाबाद जिल्ह्यात बोधन  गाव आहे.  नांदेड जिल्ह्याची  सीमा संपल्यानंतर महाराष्ट्र सिमेनंतर आंध्र सिमेस प्रारंभ होतो व  सिमेपासून काही अंतरावर हरीद्रा नदी वाहते. या नदीच्या काठी  मातेचे पूर्वी स्थान होते. कालांतराने ते बोधन गावच्या मध्यभागी  मातेचे जागृत स्थान स्थायीक झाले. तेथूनच देवी खामगावात  आली.   कै.कैरन्ना आनंदे हे लोहगाव येथील रहिवासी होते.  बिड्याच्या व्यवसायाकरिता लागणार्‍या पानाच्या व्यवहाराकरिता  बोधन येथे त्यांचे येण-जाणे राहायचे. त्यामुळे ते बोधनच्या मा तेचे भक्त झाले. लोहगाव येथे मातेच्या मूर्तीची स्थापना करून उ त्सव साजरा करत. कालांतराने ते बिड्याच्या व्यवसायाकरिता  खामगाव शहरात येऊन आपला व्यवसाय सुरू केला. त्यानंतर  खामगावात त्यांनी आपल्या स्वत:च्या बिडी कारखान्यातील सर्व  जातीधर्माच्या कामगारांच्या सहाय्याने हा उत्सव सुरू केला. हीच  प्रथा सुरू आहे.

दर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविकांची उपस्थिती!या उत्सवाकरिता भक्तगण अतिश्रद्धेने मुंबई, पुणे, नागपूर,  तुळजापूर, बडोदा, कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील कानाको पर्‍यातून देवीच्या दर्शनाकरिता भाविक खामगाव येथे येतात. ही  देवी जागृत मानली जात असल्याने भाविकांसाठी या उत्सवाचे  वेगळेच असे महत्त्व आहे. उत्सवामध्ये जगदंबेच्या दर्शनासाठी  भक्तांकरिता २४ तास आईचा दरबार खुला असतो. दरम्यान, उ त्सव काळात दहा दिवस भाविक स्त्री-पुरूष यांच्याकडून दान  केलेल्या साड्या, पातळे, चोळ्या यांचे गरजुंना वाटप केल्या जा ते. मोठी देवी संस्थानचे विद्यमान विश्‍वस्तांपैकी जगन्नाथ  आगीनकर ज्येष्ठ सदस्य आहेत आहे. त्यांच्या पहाडी आवाजा तून गायलेल्या जगदंबेच्या आरत्या जोगवा सर्वांच्या स्वरातून  उठून निघतात.