शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

बुलडाणा जिल्ह्यात शंतनु लद्धड प्रथम

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

बुलडाणा जिल्हा विभागात प्रथम; निकालात मुलींची बाजी.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याने यावर्षीसुद्धा दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावून आपला लौकिक कायम ठेवला आहे. जिल्ह्याचा निकाल ८८.९१ टक्के एवढा लागला आहे. बुलडाण्यातील सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी व प्रख्यात डॉक्टर दीपक व डॉ. संगीता लद्धड यांचा मुलगा शंतनु लद्धड याने दहावीच्या परीक्षेत ५00 पैकी ४९३ म्हणजेच ९८.६0 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले आहे. बुलडाण्याच्या भारत विद्यालयातील पूनम राऊत, वैष्णवी राठी, स्नेहा गजानन खर्चे, हर्षद पंजाबराव अंभारे या चौघांनाही ९८.२0 टक्के गुण मिळाले असून, त्यांनी गुणवत्तेचा झेंडा उंचविला आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची टक्केवारी ही गुणांचा पाऊस पडावा अशी अचंबित करणारी असून, क्रीडा गुणांमुळे तर काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. जिल्ह्याच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९0.४१ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील ४९२ शाळांमधून ४१ हजार २७१ विद्यार्थी नोंदविल्या गेले होते. प्रत्यक्षात ४१ हजार १४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये ३६ हजार ५८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हा निकाल ८८.९१ टक्के एवढा लागला आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८७.६९ एवढे असून, मुलींची टक्केवारी ९0.४१ टक्के एवढी आहे. तर मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यामध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९७.२७ टक्के एवढे असून, जिल्ह्यात हा तालुका ९५.७६ टक्के निकाल देत अव्वल ठरला आहे, तर त्या खालोखाल दे. राजा ९३.९0 टक्के व मोताळय़ाचा ९३.५0 टक्के निकाल देत दुसरा व तिसर्‍या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे, तर सर्वाधिक कमी निकाल शेगाव तालुक्याने ८१.५५ टक्के दिला आहे. बुलडाणा तालुक्यातून ४ हजार ७२६ मुले पास झाली. मोताळा तालुक्यातून २ हजार ११३ विद्यार्थी पास झाले आहेत. चिखली तालुक्यात ४ हजार ४८९ विद्यार्थी पास झाले. देऊळगावराजा तालुक्यात २२४९ विद्यार्थी पास झाले. सिंदखेडराजा तालुक्यात २४८७ विद्यार्थी पास झाले. लोणार तालुक्यात २३४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २0४९ विद्यार्थी पास झाले आहेत. मेहकर तालुक्यात ४१९२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३६२८ विद्यार्थी पास झाले. खामगाव तालुक्यातून ४ हजार ८५0 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ४ हजार १९२ विद्यार्थी पास झाले. शेगाव तालुक्यात २ हजार १४४ विद्यार्थी पास झाले. नांदुरा तालुक्यात २ हजार २५0 विद्यार्थी पास झाले. मलकापूर २ हजार ६३८ विद्यार्थी पास झाले. जळगाव जामोद तालुक्यात २0९५ विद्यार्थी पास झाले. संग्रामपूर तालुक्यात १७९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १ हजार १५२५ विद्यार्थी पास झाले.