शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सात गावे भूस्खलनाच्या छायेत!

By admin | Updated: August 3, 2016 00:21 IST

जास्त पावसामुळे धोका वाढला: प्रशासकीय स्तरावर कोणत्याही उपाययोजना नाहीत!

बुलडाणा: मलकापूर मार्गावर जवळपास ४ कि.मी.चा वळणदार घाट शहराला लाभला आहे. शहराच्या चारही बाजूंनी अजिंठा डोंगर आहेत. त्यामुळे शहराचा विस्तार थेट डोंगररांगांपर्यंत झाला आहे; मात्र पावसाळ्यात या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सात गावांना कधीही भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. यावर्षी होत असलेल्या अतवृष्टीमुळे हा धोका अधिकच वाढला आहे. मलकापूर मार्गावरील असलेल्या राजूर घाटाच्या पायथ्याशी खडकी, खामखेड, मोहेगाव, खैरखेड, नळकुंड, हनवतखेड, कुर्‍हा या गावांशिवाय बर्‍याच लहान-मोठय़ा लोकवस्त्या वसलेल्या आहेत. या वस्तीमधील बरशे घर थेट डोंगराच्या अध्र्यापर्यंत चढलेले आहे; मात्र डोंगर मुरमाड खडकाचा बनला असून, अति पाऊस पडला की, माती भुसभुशीत होऊन खाली घसरण्याची शक्यता जास्त आहे. या गावांपैकी खडकी हे गाव सर्वाधिक असुरक्षित आहे. गावातील काही घरे थेट डोंगर पायथ्यावर चढलेली आहे. त्यामुळे या घरांना भूस्खलनाचा मोठा धोका आहे. ढगफुटी अथवा अधिक पाऊस पडला तर गावातील काही भागांना धोका पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. बंधार्‍याचा धोकामोताळा तालुक्यात येणार्‍या खडकी गावाला तिन्ही बाजूला डोंगराचा वेढा आहे. गावापासून दीड किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत बंधारा आहे. बंधार्‍यातून एका लहान नाल्याद्वारे गावात पाणी येते. याच पाण्याचा वापर करुन ग्रामस्थ शेतीमध्ये पीक घेतात. गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे या बंधार्‍याने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे नाल्याद्वारे पाणी गावात शिरले. या पाण्याचे शेतातील उभे पीक झोपवली आणि घरांचे मोठे नुकसान झाले होते.पाण्याचे लोंढे येतात गावातकधी अतवृष्टी झाली तर, डोंगर माथ्याहून पाण्याचे मोठे लोंढे थेट या गावात वा शेतात उतरतात, बर्‍याचवेळा पाण्याचा मोठा प्रवाह आला की, शेती खरडून निघणे वा घराची पडझड होण्याची शक्यता असते.