शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

सात हजार विद्यार्थ्यांंचा कोंबून प्रवास

By admin | Updated: September 6, 2014 01:07 IST

खामगाव आगारात बसेस पडताहेत अपुर्‍या; दररोज ७ हजार पासधारक विद्यार्थ्यांंच्या कोंबून प्रवास.

खामगाव : खामगाव आगाराच्या एस.टी.बसेसमधून दररोज सात हजार विद्यार्थी अप डाऊन करीत आहेत. परंतु या विद्यार्थ्यांंंच्या प्रवासाकरिता असणार्‍या बसेस अपुर्‍या पडत आहेत. परिणामी दररोज विद्यार्थ्यांंंना एसटीमधून कोंबून प्रवास करावा लागत आहे. तर दुसरीकडे आगारात वाहकाची ३0 पदे रिक्त असल्याने खामगाव आगाराची कसरत होत आहे.गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एस.टी. पोहचली आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या टोकावर पोहचण्याचे काम एस.टी.ने केले आहे. म्हणून आजही प्रवाशांच्या मनात एसटीचे महत्व अबाधित आहे. खामगाव हे घाटाखाली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथे विविध महाविद्यालये, आय.टी.आय. शासकीय तंत्रनिकेतन, इंजिनिअरींग कॉलेज तसेच विविध शैक्षणिक, व्यावसायीक संस्था कार्यरत आहेत. खामगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांंंचा ओढा येथे वाढला आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांंंसोबतच अकोला, जिल्ह्यासह शेगाव, नांदुरा, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद, मोताळा या तालुक्यातील पासधारकांची संख्या वाढली आहे. विद्यार्थी तसेच इतर पासधारक सवलतीचा लाभ घेतात. खामगाव आगाराच्या बसेसमधून दररोज ७ हजार पासधारक प्रवास करीत असल्याचे समजते. सकाळी शाळेत येतांना व परत जातावेळेस विद्यार्थ्यांंंची एस टी मध्ये तोबा गर्दी असते. एका बसमध्ये ४४ बसलेले व ११ उभे अशी आसनव्यवस्था असतांना सध्या एका बसमधून १00 पेक्षा जास्त प्रवाशी पर्याय नाही म्हणून प्रवास करीत आहे. यामध्ये विद्यार्थी तर अक्षरश: कोंबले जातात. शाळेत शिकायचे म्हणून विद्यार्थी हे सर्व निमुटपणे सहन करीत आहे. तर दुसरीकडे खामगाव आगारात सद्यास्थितीत ६0 बसेस उपलब्ध आहेत. मात्र यावरही वाहकांची कमतरता असल्याने आगार व्यवस्थापकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. आगारातील एस.टी. बसेसना २५0 पेक्षा जास्त फेर्‍या करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खामगाव आगारातून लाखनवाडा, शहापूर, पिंपळगाव राजा, माटरगाव, नांदुरा, नागपूर, वर्णा, दिवठाणा, गारडगाव, अटाळी या मार्गावर विद्यार्थ्यांंंची गर्दी मोठय़ा प्रमाणात असल्याने बसगाड्या वाढविण्याची मागणी पालकांमधून होत आहे. तर वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देवून दखल घेण्याची गरज आहे. आगारात उपलब्ध बसगाड्या व कर्मचारी यांचा समन्वय साधून प्रवाशांना नियमीत सेवा पुरविण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र ऐन वेळेवर तांत्रिक अडचणी वा कर्मचार्‍यांच्या अडचणी पाहता नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे आगार व्यवस्थापक सुभाष पाटील यांनी सांगीतले.