शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Buldhana : आणखी सात पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण संख्या २६०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 12:10 IST

बुलडाणा जिल्ह्यातील रुग्ण संख्या ही ३०० च्या टप्प्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढता असून गुरूवारी सात कोरोना बाधीत आढळून आलयाने जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या २६० वर पोहोचली आहे. त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्यातील रुग्ण संख्या ही ३०० च्या टप्प्यात आली आहे.अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी १०१ अहवाल गुरूवारी प्राप्त झाले. त्यापैकी ९४ अहवाल निगेटिव्ह आले. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये खामगांव येथील १८ वर्षाची युवती, ३२ वर्षी महिला, सिंदखेड राजा येथील ३५ वर्षी य महिला, मलकापूर शहरातील शक्तीनगरमधील ७५ वर्षीय वृद्ध आणि एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान बुलडाणा येथील १९ वर्षीय युवक आणि बुलडाणा तालुक्यातीलच माळवंडी येथील ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोना बाधीतांमध्ये समावेश आहे.दुसरीकडे आतापर्यंत दोन हजार ७९२ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्या १५४ जणांना आतापर्यंत रुग्णालयामधून सुटी देण्यात आली आहे. दोन जुलै रोजी १०१ अहवाल प्राप्त झाले असून अद्याप २९३ अहवालांची प्रतीक्षा आहे. सध्या जिल्ह्यात २६० कोरोना बाधीत असून कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या जिल्ह्यात ९४ रुग्ण अ‍ॅक्टीवह असून आतापर्यंत १२ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.

रुग्ण बरे होण्याचा टक्का घसरलाजिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची एकूण संख्या तिनशेच्या टप्प्यात आली असून ९४ बाधीतांवर सध्या आयसोलेशन कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहे. दरम्यान बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ५९ टक्के आहे. ७१ टक्क्यांच्या आसपास होते. ते आता ५९ टक्यांवर आले आहे. दुसरीकडे अद्यापही २९३ व्यक्तींचे अहवाल प्रलंबीत असून त्यामध्ये नेमके किती पॉझिटिव्ह निघतात हा कळीचा मुद्दा आहे. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या