शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सभापती व प्रशासनाच्या पुढाकाराने निघाला तोडगा

By admin | Updated: January 23, 2016 02:08 IST

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्वपदावर आल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळला.

चिखली : आर्थिक चणचणीचे कारण पुढे करून स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संपूर्ण व्यवहार बाजार समिती प्रशासनाच्या आदेशावरून चार दिवसांपासून पूर्णपणे बंद होते. शेतकर्‍यांची प्रचंड गैरसोय पाहता अखेर गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समिती, अडते, व्यापारी आणि खरेदीदार यांच्यामध्ये झालेल्या समन्वय बैठकीमध्ये या समस्येवर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे २२ जानेवारीपासून बाजार समितीमधील व्यवहार पूर्वपदावर आल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. स्थानिक बाजार समितीमधील अडत्यांनी खरेदीदारांकडे व्यवहारांच्या रकमा अडकल्याने बाजारातील व्यवहार करण्यास असर्मथता दर्शविल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संपूर्ण व्यवहार सोमवार १८ जानेवारीपासून पूर्णपणे ठप्प होते. बाजार समितीनेही पुढील आदेशापर्यंंत शेतकर्‍यांनी शेतमाल विक्रीस आणू नये, असे कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या हितासाठी आणि गैरसोय टाळण्यासाठी जाहीर केले होते. बाजार समितीने अडते आणि खरेदीदार यांच्यातील व्यवहारासंदर्भातील वाद समन्वयाने मिटावा आणि बाजार पूर्ववत सुरू व्हावा, यासाठी गेल्या चार दिवसांपासून बरीच खलबते चालविली होती. परंतु दोन्ही घटक आपापल्या भूमिकांबाबत ठाम असल्याने या प्रकरणावर पडदा पडत नव्हता. अखेर बाजार समितीचे सभापती विष्णू पाटील यांच्या पुढाकाराने २१ जानेवारी रोजी व्यापारी आणि खरेदीदार यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करुन सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान शेतकर्‍यांच्या हितासाठी सर्वांंनी आपापल्या भूमिकेमध्ये सुवर्णमध्य काढण्याचा सल्ला सभापती विष्णू पाटील कुळसुंदर यांनी व्यक्त केला. सुमारे दोन तास चाललेल्या या प्रदीर्घ चर्चेत शेतकरी हितासाठी समन्वयाने तोडगा काढण्यात निघाल्याने २२ जानेवारीपासून बाजार पूर्णपणे पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये बाजार समितीचे सभापती विष्णू पाटील कुळसुंदर, माजी प्रशासक दिनदयाल वाधवाणी, संचालक काशिनाथआप्पा बोंद्रे, मनोज खेडेकर, रूपराव सावळे, धनंजय पवार, प्रेमराज भाला, बाळू वराडे, सुधीर पडघान, अडते, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, सचिव पवन अग्रवाल, गोविंद कोठारी यांच्यासह समितीचे सचिव अजय मिरकड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावून तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले.