शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

‘सर्पमित्र’मुळे अनेकांना दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:43 IST

खामगाव : साप दिसल्यास त्याला न मारता त्याची माहिती जाणून घ्यावी व साप दिसल्यास त्याला जीवदान देण्यासाठी सर्पमित्रांच्या मोबाइल क्रमांकासह इत्थंभूत माहिती असलेले ‘सर्पमित्र अ‍ॅप’ विकसित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे‘अ‍ॅप’मध्ये अडीच हजार सर्पमित्रांचे फोन क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : साप दिसल्यास त्याला न मारता त्याची माहिती जाणून घ्यावी व साप दिसल्यास त्याला जीवदान देण्यासाठी सर्पमित्रांच्या मोबाइल क्रमांकासह इत्थंभूत माहिती असलेले ‘सर्पमित्र अ‍ॅप’ विकसित करण्यात आले आहे.या अ‍ॅपमध्ये राज्यातील सर्व जिल्हे व तालुक्यातील सुमारे अडीच हजार सर्पमित्रांचे मोबाइल क्रमांक समाविष्ट करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या अ‍ॅन्ड्राइड मोबाइलमधील गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन सर्पमित्र अ‍ॅप टाइप करून सदर अ‍ॅप इन्स्टॉल करावे व नवीन युजर बनावे. या अ‍ॅपमध्ये राज्यातील ३५ जिल्ह्यांतील सुमारे अडीच हजार सर्पमित्रांचे मोबाइल क्रमांक समाविष्ट करण्यात आलेले आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश असून, खामगाव शहरातील १८ सर्पमित्रांच्या क्रमांकाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. याचबरोबर अ‍ॅपमध्ये सर्पदंशानंतर रुग्णास जवळच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णालयांची माहितीही देण्यात आली आहे. तसेच वन विभागाचेही उपक्रम आणि वन्य जीवबाबतची माहितीही या अ‍ॅपमुळे नागरिकांना मिळणार आहे.खामगावातील १८ सर्प मित्रांचा अ‍ॅपमध्ये समावेश!राज्यातील अडीच हजार सर्प मित्रांचा समावेश असलेल्या या अ‍ॅपमध्ये खामगाव शहरातील १८ सर्पमित्रांच्या क्रमांकाचाही समावेश आहे. या सर्पमित्र अ‍ॅपमध्ये विषारी व बिनविषारी सापांच्या सर्व प्रजातींची माहिती नमूद करण्यात आलेली आहे. याचबरोबर साप निघाल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबतही माहिती नमूद केलेली आहे. तसेच सापांना पकडण्यासाठी या अ‍ॅपमध्ये सुमारे अडीच हजार सर्पमित्रांचे नावासह मोबाइल क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. जेणेकरून नागरिकांना साप दिल्यास त्यांच्या जवळपासच्या सर्पमित्रांना संपर्क साधणे सोईस्कर होणार आहे.घरामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी साप आढळून आल्यास नागरिकांनी प्रथम वन विभाग कार्यालयात संपर्क करावा. नागरिकांनी सर्पमित्र अ‍ॅपचा उपयोग करून सापांबद्दल माहिती जाणून घ्यावी.- सोळंके, वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगाव.