सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रिया शिनगारे होत्या. तर अनंथा मिसाळ, निरंजन जाधव, सरपंच नितीन देवकर, गजानन गवई, सुभेदार यशवंतराव शिनगारे, एस. के. जाधव, सिद्धार्थ छडीदार, प्रदीप जाधव, प्रदीप गवई, दिगंबर पवार, प्रदीप गोलांडे, पंडित नेवरे, कैलास निर्मळे, दत्ता जाधव, गौतम अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ज्येष्ठ कलावंत शाहीर भीमराव मिसाळ, भिवाजी पवार, विश्वनाथ अवसरमोल, भिवाजी धुरंधर, भीमराव खंडारे, वसंतराव गव्हांदे यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने रमाबाई आंबेडकर बचत गट, सावित्रीबाई फुले बचत गट जांभोरा व महिला गायन मंडळ कोलारा, पंचशील गायन मंडळ येवता, पंचशील गायन मंडळ चांधई यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम पार पडला. संचालन प्रीतमकुमार मिसाळ व प्रास्ताविक रामदास मलवार यांनी केले. आभार संजय निकाळजे यांनी मानले.
ज्येष्ठ कलावंतांचा पुरस्कार सोहळा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:32 IST