शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपतील तणाव; डीआयजींनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

दुसरीकडे उभय बाजूंशी आपली चर्चा झाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याचे आश्वासन दोन्ही बाजूंकडून देण्यात आले आहे. ...

दुसरीकडे उभय बाजूंशी आपली चर्चा झाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याचे आश्वासन दोन्ही बाजूंकडून देण्यात आले आहे. जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

--अधिकाऱ्यांची घेतली बैठक--

सकाळीच बुलडाण्यात दाखल झालेल्या डीआयजींनी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोड यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कोरोना संसर्गाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या दृष्टीने उपाययोजना करून त्यादृष्टीने बंदोबस्त लावण्यात यावा, अशा सूचना दिला.

--राजकीय तणाव निवळला--

सोमवारी भाजपने हा विषय आमच्यासाठी संपल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केेले होते. त्याच धर्तीवर महाविकास आघाडीतर्फे खा. प्रतापराव जाधव यांनी हा विषय आमच्यासाठी संपला असल्याचे सांगतिले. सोबतच कोरोनाची साथ पाहता उभय बाजूंनी ‘साथ-साथ’ येऊन त्याचा मुकाबला करणे गरजेचे आहे. शक्तिप्रदर्शन न करता कोरोना प्रतिबंधासाठी आपली शक्ती वापरावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनांवर शिवसेना भर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना-भाजपमधील वादग्रस्त वक्तव्यावरून निर्माण झालेला तणाव आता निवळला असल्याचे चिन्ह आहेत. सोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती आणि पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांचीही भेट घेऊन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.