शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चोरी करून आणलेली गाय विकली; शेगावात काही काळ तणाव

By admin | Updated: June 29, 2017 19:55 IST

शेगाव : चोरी करून आणलेली गाय शेगाव शहरात विकत घेतल्याचे समजल्या नंतर गुरुवारी शेगावात मुरारका विद्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : चोरी करून आणलेली गाय शेगाव शहरात विकत घेतल्याचे समजल्या नंतर गुरुवारी शेगावात मुरारका विद्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना पो.स्ट. ला आणल्याने तणाव निवळला.शेगाव शहरातील मुरारका विद्यालयाच्या मागे राहणाऱ्या रुकसाना बी उम्मीद खाँ या महिलेने दोन दिवसांपूर्वी चिंचोली ता. शेगाव येथील भास्कर गिरी नामक इसमाकडून एक गाय ३२०० रुपयात विकत घेतली होती. याबाबतची माहिती चिंचोली येथील काही युवकांना मिळाल्यावरून त्यांनी गुरुवारी मुरारका विद्यालय परिसरातील त्या घराजवळ पोहचून सदर गायीबाबत विचारणा केली. मात्र यावेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्याठिकाणी वाद निर्माण होऊन काही काळ तणाव निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून त्यांनी सर्वांना पो.स्टे. ला आणले. यावेळी चौकशी केल्या नंतर सदर गाय मेंढपाळ मैनाबाई चंद्रभान जाधव रा. पिंपळगाव नाथ यांच्या मालकीची असून काही दिवसांपूर्वी ती चिंचोली येथील जनावरांच्या कळपात चालत चालत चिंचोली ला पोहचली होती. यानंतर २ दिवसांपूर्वी गुरे चारणारा भास्कर गिरी याने सदर गाय वाड्यावर पोहचून येतो असे सांगून गावातून गाय शेगाव ला आणून रुकसाना बी उम्मीद खा रा. शेगाव यांना ३२०० रुपयात विकली होती असे पोलिसांना समजले. मात्र गाय कापण्यासाठी जात असल्याची अफवा शहरात पसरल्याने शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वृत्त लिही पर्यंत पोलिसांनी सदर गायीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु केली होती.