शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

स्वयंप्रेरणेतून विधायक कार्य; ही संघ संस्कृती : राम देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : राष्टÑीय स्वयंसेवक संघ राजाश्रयावर जिवित नाही तर राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारी आणि स्वयंप्रेरणेतून विधायक कार्य करणारी एक संस्कृती असल्याचे प्रतिपादन प्राचार्य राम देशमुख यांनी रा.स्व.संघाच्या विजयादशमी उत्सवात केले.स्थानिक श्री शिवाजी विज्ञान व कला वरिष्ठ महाविद्यालयच्या क्रिडा संकुलावर ८ आॅक्टोबर रोजी संघाच्यावतीने आयोजित  चिखली नगर ...

ठळक मुद्देचिखली नगराचा विजयादशी उत्सवप्राचार्य राम देशमुख यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : राष्टÑीय स्वयंसेवक संघ राजाश्रयावर जिवित नाही तर राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारी आणि स्वयंप्रेरणेतून विधायक कार्य करणारी एक संस्कृती असल्याचे प्रतिपादन प्राचार्य राम देशमुख यांनी रा.स्व.संघाच्या विजयादशमी उत्सवात केले.स्थानिक श्री शिवाजी विज्ञान व कला वरिष्ठ महाविद्यालयच्या क्रिडा संकुलावर ८ आॅक्टोबर रोजी संघाच्यावतीने आयोजित  चिखली नगर विजयादशमी उत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी स्टेट बँक आॅफ इंडिया चिखली शाखाधिकारी हेमंत बर्वे, जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर, तालुका संघचालक अरविंद असोलकर, नगर संघचालक शरद भाला यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना प्राचार्य देशमुख म्हणाले की,  स्वयंप्रेरणेनतून विधायक कार्य करणे ही आपली संस्कृती आहे, ही अवस्था उत्पन्न करण्यासाठीच संघ काम करतो आहे संघ राजाश्रयावर जिवित नाही. राजाश्रयावर वाढणाºया संघटना आणि संघात खूप फरक आहे. तर भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत. या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य कार्य  आहे. त्यामुळे भारतीय म्हणजे हिंदू ही संघाची व्यापक भूमिका आहे. हिंदू समाज हा पुरातन काळापासूनच अनेक वर्ण, जाती, पंथ यात विभागला गेला आहे. प्रत्येक जात स्वत:ला इतरांपेक्षा वेगळी समजते. कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेष तसेच जातिभेदाला थारा नसलेल्या व तमाम जातीपंथांमध्ये एकोपा असलेला हिंदू समाज असणे हे संघाला अपेक्षीत असल्याचे स्पष्ट करून राजकीय व्यवस्था म्हणजे राष्ट्र नव्हे तर सांस्कृतिक एकसुत्रता म्हणजे राष्ट्र होय. सांस्कृतिक सभ्यतेची अस्मीता जपण्याचे कार्य संघ पूर्वीपासून करीत आहे. भारत हे हिंदुराष्ट्र आहे याची जाणीव सुद्धा आज संघच करून देत आहे असे राम देशमुख म्हणाले. तर हेमंत बर्वे यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना व विजयादशमी उत्सवाचे महत्व विषद केले. प्रास्ताविकात शरद भाला यांनी संघ शाखा नुसते खेळ, कवायती करण्याचे स्थान नसून सज्जनांच्या सुरक्षेचे एक मूक अभिवचन, तरूणांना व्यसनमुक्त ठेवणारे संस्कारपीठ असल्याने नागरिकांनी आपआपली मुले दैनंदिन शाखेत पाठवावी, जेणेकरून येणारी पिढी संस्कारक्षम बनेल असे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजनाने झाली. प्रार्थना, घोषवादन, सांघिक गीत, सुभाषित, अमृतवचन तसेच चिखली नगरातील विविध शाखेतील स्वयंसेवकांनी शारीरिक प्रात्याक्षिके सादर केली.