शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

  ‘स्वाभीमानी’चे आत्मक्लेष आंदोलन; रविकांत तुपकर यांनी स्वत:ला घेतले जमीनीत गाडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 15:58 IST

नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

मोताळा: अतिपावसामुळे जिल्ह्यात पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी शेतकºयांना त्वरित मोबदला द्यावा, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात मोताळा तालुक्यातील परडा शिवारात शेतातच स्वत:ला मानेपर्यंत गाडून घेत आत्मक्लेष आंदोलन करण्यात येत आहे. जो पर्यंत शेतकºयांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.यंदा अतिपावसामुळे शेतकºयांचे मका, सोयाबीन, मुग, उडीद, कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र प्रत्यक्षात कोठे पंचनामे झाले नाही. नुकसानाचा अंतिम अहवालही अद्याप सादर करण्यात आलेला नाही. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र त्यास कुठलीच मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, ही प्रमुख मागणी घेवून हे आंदोलन २३ सप्टेंबर रोजी रविकांत तुपकर यांनी मोताळा तालुक्यातील परडा शिवारात एका शेतात स्वत:ला गळ््यापर्यंत जमिनीत गाडून घेत हे समाधी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या समवेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सय्यद वसीम, शेख रफीक शेख करीम आणि दत्ता पाटील या त्यांच्या सहकाºयांनीही त्यांच्या समवेत गळ््या पर्यंत स्वत:ला जमिनीत गाडून घेत हे आंदोलन सुरू केले आहे.गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २२१ गावातील दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. शेत पिकांसह, जमीन खरडून गेल्याचेही प्रकार यात झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. गेल्या वर्षीही खरीप आणि रब्बी पिकांचेही अति पावसामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे गतवर्षीेचे दोन्ही हंगाम हातचे गेले यंदाही खरीपाचा हंगाम हातचा गेल्यात जमा असल्याचे सांगत रविकांत तुपकर यांनी शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

तहसिलदार आंदोलन स्थळी‘स्वाभीमानी’च्या या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार व्ही. एस. कुमरे आणि बोराखेडीचे ठाणेदार हे आंदोलनस्थळी पोहोचले असून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र जो पर्यंत शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई मिळत नाही, तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका तुपकर यांनी घेतली आहे. त्यामुळे आता आंदोलनाची तिव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आमच्या रक्ताचा नैवेद्य द्यायचा का- तुपकरशेतकरी नुकसानामुळे त्रस्त आहे. गतवर्षीही अशीच स्थिती होती. यंदाही तिच स्थिती आहे. त्यामुळे शेतकºयांना मदत मिळण्यासाठी आता आम्ही शेतकºयांनी आमच्याच रक्ताचा नैवेद्य द्यायचा का? असा संतप्त सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRavikant Tupkarरविकांत तुपकरbuldhanaबुलडाणा