शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी जिल्ह्यातील तीन शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST

धामणगाव बढे : ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील तीन शाळांची ज्ञानज्योती सवित्रीबाई फुले गुणवत्ता ...

धामणगाव बढे : ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील तीन शाळांची ज्ञानज्योती सवित्रीबाई फुले गुणवत्ता पूर्ण शिक्षण अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मोताळा तालुक्यातील सिंदखेड, शेगाव तालुक्यातील टाकली विरो आणि चिखली तालुक्यातील करवंड येथील शाळांचा समावेश आहे.

ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यात "ज्ञानज्योती सवित्रीबाई फुले गुणवत्ता पूर्ण शिक्षण आभियान" राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातून १०० आदर्श शाळांची निवड करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या निर्देशानुसार ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे नोडल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २६ फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मोताळा तालुक्यातील सिंदखेड, शेगाव तालुक्यातील टाकळी विरो आणि चिखली तालुक्यातील करवंड जिल्हा परिषद शाळांची नावे मुंबई येथे या उपक्रमासाठी पाठविण्यात आली होती. शुक्रवारी या तिन्ही शाळांची निवड झाल्याचे मुंबई येथून स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळांचा भौतिक विकास, शाळा समिती बळकटीकरण, आनंददायी शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम पूर्ण ताकदीने राबविण्यात येणार आहेत. सोबतच या तिन्ही शाळा राज्यात आदर्श कराव्यात, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या आहेत.

सदर योजने अंतर्गत राज्य मूल्यांकन समितीमार्फत निकष पूर्ण करणाऱ्या शाळेला ३ जानेवारी २०२२ रोजी सावित्री बाई फुले जयंतीला आदर्श शाळा म्हणून निवड व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सिंदखेड येथील शाळेच्या निवडीबद्दल सरपंच सीमा कदम यांनी आनंद व्यक्त केला असून, समितीने दिलेले निकष पूर्ण करून सिंदखेड शाळा राज्यासाठी नवा आदर्श निर्माण करेल, त्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

--अभियानाची उद्दिष्टे--

भौतिक सुविधांमध्ये मुला - मुलींना स्वतंत्र शौचालय, शुद्ध पाणी, हॅन्ड वॉश स्टेशन, बसण्यासाठी बेंच, शाळेला संरक्षण कुंपण राहील. यासोबतच पर्यावरणस्नेही शाळा व आरोग्यसाठी स्वच्छता ठेवणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समिती बळकटीकरण यांचा समावेश आहे.