शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’साठी २४५ गावांची निवड

By admin | Updated: May 2, 2016 02:26 IST

बुलडाणा येथे राज्याचा ५६ वा स्थापना दिवस थाटात संपन्न.

बुलडाणा : भूजल पातळी वाढवून मोठय़ा प्रमाणावर संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी सन २0१६-१७ साठी दुसर्‍या टप्प्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, या गावांचा ३३७.२0 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचा ५६ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर १ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर संबोधित करीत होते. याप्रसंगी माजी आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्ष टी. डी. अंभोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बाविस्कर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नेवाणे, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना मुबलक व पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यास शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात ८४५ गावांचा पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार ५0 गावांमध्ये ५६ टँकरद्वारे, २७५ गावांमध्ये अधिग्रहित ३२१ खासगी विहिरींद्वारे, ९ गावांमध्ये ११ विंधन विहिरींद्वारे पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे. प्रशासनाने विविध उपाययोजनांमुळे पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार असल्याचा विश्‍वास जिल्हाधिकारी डॉ. झाडे यांनी व्यक्त केला.