शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धाडनजीक पकडलेल्या गांजाचे मूळ ओडिशामध्ये, चालू आर्थिक वर्षातील होती मोठी कारवाई

By निलेश जोशी | Updated: December 22, 2023 21:23 IST

नक्षलग्रस्त ब्रह्मपूरमधून होताे गांजाचा पुरवठा: पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर

बुलढाणा: गेल्या महिन्यात विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर धाडनजीक पकडण्यात आलेल्या चार क्विंटल अर्थात ९२ लाख रुपयांचा गांजा हा ओडिशा राज्यातील नक्षलग्रस्त ब्रह्मपूर भागातून जिल्ह्यात आणला गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ओडिशामधील या पट्ट्यात फिरून प्रकरणातील पुरवठादार राजू नामक आरोपीचा माग काढण्यात यशस्वी झाल्याचेही माहिती आहे.

परिणामी अल्पावधीत या आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात ओडिशा राज्यातील दुर्गम भागातून हा गांजा येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच आंध्र प्रदेशमधूनही बुलढाणा जिल्ह्यात गांजा येत असल्याचा पोलिसांचा कयास आहे.

८ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने धाडनजीक म्हसला बुद्रूक येथे ९२ लाख रुपयांच्या गांजासह १ कोटी ४८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. चार क्विंटलपेक्षा अधिक ५९ किलो ऐवढा हा गांजा होता. ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री जालना जिल्ह्यातील भोकरदनकडून धाडकडे येणाऱ्या एका मालवाहू वाहनात मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने एलसीबी आणि धाड पोलिसांनी म्हसला गावानजीक सापळा रचत डीडी-०१-सी-९१३१ या क्रमांकाचे वाहन ताब्यात घेतले होते. या प्रकरणात राहुल गोटीराम साबळे (२७ रा. कुऱ्हा, ता. मोताळा) यास ताब्यात घेण्यात आले होते. तर त्याचा एक साथीदार फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात त्याच्यासह आणखी दोघांना ताब्यात घेतले. त्यातील एका आरोपीस गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

चालू आर्थिक वर्षातील होती मोठी कारवाईधाडनजीक करण्यात आलेली कारवाई ही चालू आर्थिक वर्षातील मोठी कारवाई होती. त्यामुळे या कारवाईची चर्चा होती. दरम्यान प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे संबंधित वाहनाद्वारे बुलढाणा जिल्ह्यासह लगतच्या पट्ट्यात गांजाचा पुरवठा करत जात होते, असेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या लगतच्या पट्ट्यातही त्यांचे लागेबांधे असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीनेही सध्या बुलढाणा पोलिस तपास करत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDrugsअमली पदार्थ