शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लाटेत तरुणांच्या गळ्याला काेराेनाचा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 11:40 IST

Corona Cases in Buldhana : १९ दिवसांत जिल्ह्यात कोरोनामुळे १११ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये ४५ वर्षांखालील १८ जणांचा समावेश आहे.  

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशातच कहर केला असून, मृत्यूसंख्याही वाढत आहे. या लाटेत वयोवृद्धांसोबतच तरुणांनाही प्राणास मुकावे लागत आहे. मे महिन्यामध्ये केवळ १९ दिवसांत जिल्ह्यात कोरोनामुळे १११ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये ४५ वर्षांखालील १८ जणांचा समावेश आहे.  कोरोनामुळे गतवर्षी नागरिकांमध्ये प्रचंड भीती होती. मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी होते. ऑक्टोबर २०२० च्या दरम्यान कोरोनाचे रुग्ण देशात कमी व्हायला लागले. त्यामुळे सर्व व्यवहार पूर्वपदावर येत होते. मात्र, जानेवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेत कोरोनाबाधित झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण वाढले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बहुतांश वयोवृद्धांचाच मृत्यू झाला. तर काही वयोवृद्धांनी रोगप्रतिकारशक्तीच्या बळावर कोरोनाचा पराभव केला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या लाटेत केवळ वयोवृद्धच नाही तर तरुणांनाही प्राणास मुकावे लागत आहे. गत वीस दिवसांमध्ये जिल्ह्यात १११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर ४५ वर्षे वयोगटातील १८ तरुणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २१ वर्षीय व २८ वर्षीय तरुणांचाही समावेश आहे.  कोरोनामुळे घरातील कर्ते पुरुष गेल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी आपले मुलं व मुली गमावल्याने म्हातारपणात त्यांचा आधार कोरोनाने हिरावला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

४५ च्या आतील १८ जणांचा मृत्यू   २ मे रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील दुर्गापुरा येथील २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर ३ मे रोजी बुलडाणा येथील ३६ वर्षीय पुरुष व खंडाळा येथील ४२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.   ४ मे रोजी खामगाव शहरातील फाटकपुरा भागातील ४० वर्षीय पुरुष, खामगाव तालुक्यातील ३४ वर्षीय पुरुष, ५ मे रोजी खामगाव तालुक्यातील लांजूड येथील ३८ वर्षीय महिला, ६ मे रोजी टेंभुर्णा येथील ३७ वर्षीय महिला, ७ मे रोजी मलकापूर येथील ४३ वर्षीय पुरुष, ८ मे रोजी देऊळगाव राजा येथील दुर्गापूर येथील ४४ वर्षीय महिला, ९ मे रोजी बाळापूर  तालुक्यातील पारस येथील २८ वर्षीय पुरुष, १० मे रोजी खामगाव शहरातील अभयनगर भागातील ४३ वर्षीय महिला, ११ मे रोजी जलंब नाका खामगाव येथील ४३ वर्षीय पुरुष, १४ मे रोजी मारोती पेठ मेहकरमधील ४५ वर्षीय पुरुष, १५ मे रोजी मेहकर येथील ४५ वर्षीय पुरुष, १६ मे रोजी माक्ता कोक्ता येथील ४२ वर्षीय पुरुष, बुलडाणा येथील ३६ वर्षीय पुरुष, १८ मे रोजी तांदूळवाडी येथील ४० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.   जिल्ह्याचा मृत्यूदर ०.६७ टक्के असून, दररोज कोरोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. रोजगारासाठी तसेच विविध कामानिमित्त घराबाहेर पडणारे तरुण बाधित होत आहे. त्यांच्यामुळेच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यही बाधित होत आहेत. कोरोनामुळे घरातील कर्ते पुरुष गमावल्याने अनेक कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे.    

२१ व २८ वर्षीय तरुणांनी गमावले प्राण कोरोनामुळे जिल्ह्यातील देऊळगाव  राजा तालुक्यातील दुर्गापुरा येथील २१ वर्षीय तरुणाचा २ मे रोजी मृत्यू झाला.  तसेच ९ मे रोजी बाळापूर तालुक्यातील पारस येथील एका २८ वर्षीय तरुणाला कोरोनामुळे प्राणास मुकावे लागले.   

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या