शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

‘विठ्ठल दर्शन’च्या दुसऱ्या फेरीने भाविक वारीला

By admin | Updated: June 30, 2017 00:49 IST

आषाढी एकादशी यात्रा महोत्सव : तिसरी फेरी १ जुलै, तर शेवटची २ जुलै रोजी

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आषाढी एकादशी यात्रा महोत्सवानिमित्ताने येथून सोडण्यात येणारी ‘विठ्ठल दर्शन’ ची खामगाव ते पंढरपूर रेल्वेची दुसरी फेरी ३० जून रोजी पहाटे ३ वाजता रवाना झाली. या दुसऱ्या फेरीने भाविक पंढरपूरला मार्गस्थ झाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सव अवघ्या ५ दिवसांवर आला आहे. या आषाढी सोहळ्यानिमित्ताने येथून २८ जून रोजी दुपारी ४ वाजता १२ बोगींच्या पहिल्या फेरीने ४६७ भाविकांनी पंढरीची वारी केली. दुसरी फेरी २९ जून रोजी खामगाव रेल्वे स्थानकावरून रवाना झाली. या दुसऱ्या फेरीची खामगाव येथील रेल्वे स्थानकावरुन सुटण्याची नियोजित वेळ दुपारी ४.२० वाजताची होती. मात्र मुंबई येथून उशिरा कोच पोहोचणार असल्याने ही फेरी तब्बल सहा तास उशिराने खामगाव येथून निघाली. खामगाव रेल्वे स्थानकाला फेरी उशिरा निघणार असल्याचे आधीच कळविण्यात आले. खामगाव रेल्वे स्थानक प्रबंधक संजय भगत यांनी तशा सूचना भाविकांना दिल्या होत्या. त्यामुळे भाविकांची गैरसोय टळली. मात्र, तरीही अनेक गावातील भाविकांना आपल्या गावातून खामगाव येथे येण्यासाठी रात्री उशिराची बस नसल्याने तसेच रेल्वेमध्ये जागा मिळावी, या हेतून अनेक भाविक दुपारपासूनच खामगाव येथील रेल्वे स्थानकावर हजर झाले होते. दुसऱ्या फेरीने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांना दुसऱ्या दिवशीही हरिओम गु्रप व सानंदा मित्र मंडळाच्यावतीने फराळाचे पाकिट वाटप करण्यात आले. खामगाव येथून विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसच्या आणखी दोन फेऱ्या पंढरपूरकडे जाणार असून, त्यानंतर परतीच्या देखील फेऱ्या पंढरपूर ते खामगाव राहणार आहेत. परतीच्या फेऱ्या ५ जुलै व शेवटची चौथी फेरी ६ जुलै रोजी पंढरपूर येथून खामगावकडे निघणार आहे. परतीच्या फेरीची पंढरपूर येथून सुटण्याची वेळ दुपारी ४ वाजताची असून, ही फेरी दुसरे दिवशी सकाळी ८.३० वाजता खामगाव येथे पोहोचणार आहे. उर्वरित दोन फेरींना सुद्धा जनरलच्या बोग्या राहणार आहेत. या एक्स्प्रेसचे तिकीट दर सर्वसाधारण प्रवासी १९५ रुपये, ज्येष्ठ पुरुष १२० रुपये, ज्येष्ठ महिला १०० रुपये तसेच ५ ते १२ वर्षे वयोगटातील बालकांसाठी १००, रुपये असे तिकीट दर आहेत. आणखी दोन फेऱ्याविठ्ठल दर्शन एक्स्प्रेसची तिसरी फेरी १ जुलै रोजी दुपारी ४.२० वाजता सुटणार आहे. त्यानंतर चौथी व पंढरपूरकडे जाणारी शेवटची फेरी २ जुलै रोजी खामगाव येथून सुटणार आहे. भाविकांनी या स्पेशल रेल्वे फेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्टेशन प्रबंधक संजय भगत व मुख्य बुकिंग पर्यवेक्षक गोळे यांनी केले आहे.