शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्क्रब टायफस’ आजाराचा धोका वाढला; आरोग्य पथके गठीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 20:55 IST

‘स्क्रब टायफस’ या आजाराचे महाराष्ट्र व मध्यप्रदेशमध्ये रुग्ण आढळले असून यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- योगेश फरपट खामगाव : ‘स्क्रब टायफस’ या आजाराचे महाराष्ट्र व मध्यप्रदेशमध्ये रुग्ण आढळले असून यापैकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील ईतरही भागात या आजाराचे रुग्ण असल्याच्या संशयावरून राज्य आरोग्य यंत्रणेने जनतेला सतर्कतेचा इशारा दिला असून अशा रुग्णांचा शोध घेवून त्यांना तातडीने उपचारासाठी संदर्भीत करावे अशा सूचना आरोग्य सहसंचालकांनी दिल्या आहेत. त्याधर्तीवर अकोला परिमंडळात विविध शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णांलयामध्ये शोध मोहिम सुरु झाली आहे. स्वाईनफ्लू या आजारानंतर स्क्रब टायफस या आजाराने राज्यातच नव्हेतर देशात थैमान घातले आहे. नागपूरात गत आठवड्यात चार रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य आरोग्य यंत्रणेने सतर्कता बाळगत नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद परिमंडळातील आरोग्य अधिका-यांना तातडीने उपाययोजना सुरु करण्याच्या सुचना संबधित यंत्रणेला शिघ्र ताप सर्व्हेक्षण, किटकनाशक सर्व्हेक्षण, तण नाशक फवारणी, मॅलेथीयॉन पावडरची धुरळणी, ग्रामपंचायत मार्फत परिसर स्वच्छता आदी बाबी प्राधान्याने करण्याचे निर्देशीत केले आहे. 

अकोला, अमरावती परिमंडळात धोकानागपूर नंतर अकोला व अमरावती या परिमंडळात या आजाराचे रुग्ण असू शकतात. मध्यप्रदेशातून अनेक व्यक्ती व्यवसायासाठी या भागात वास्तव्यास आहेत. त्यामुळे अशा आजाराचे रुग्ण शोधून त्यांना तातडीने उपचारसुविधा पुरवण्याबाबत सुचीत केले आहे. 

२७ आॅगस्टरोजी अकोला महापालिका क्षेत्रात रुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली. शिवाजी पार्क परिसरातील मंगेश नेवरे या रुग्णाची भेट घेण्यात आली. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. - डॉ. फारुख शेख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, अकोला महापालिका. 

काय आहे स्क्रब टायफस हा आजार 

ही आहेत लक्षणे १. बारीक किटक चावल्याने हा आजार होतो. २. दंश केलेल्या ठिकाणी जखम होवून खिपली होते. ३. आजाराच्या सुरुवातीला डोकेदुखी व अतिशय ठंडी वाजून ताप येतो. ४. सांधेदुखी व शरीराला कंप सुटतो. उपाय १. पुर्ण शरिर झाकल्या जाईल असे कपडे घालावे. २. साफसफाईची दक्षता घ्यावी. ३. घराच्या आजुबाजूला वाढलेले गवत अतिरिक्त वाढलेले झाडं काढून टाकावीत. ४. फुलाच्या सजावटीवर स्प्रे करुन घ्यावा. ५. घरात पाळलेल्या पाळीव प्राण्याच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. ६. आजाराच्या सुरवातीला योग्य निदान झाल्यास स्क्रब टायफस पुर्णपणे नाहीसा होवू शकतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणा