शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वझर आघाव येथे शाळाबंद आंदोलन

By admin | Updated: August 23, 2016 23:51 IST

लोणार तालुक्यातील विद्यार्थ्यांंनी केली शिक्षकांची मागणी.

लोणार (जि. बुलडाणा), दि. २३: तालुक्यातील वझर आघाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कायमस्वरुपी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत तिन वेळा जनआंदोलन करण्यात आले. तरीही पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून दखल घेण्यात आली नाही. यामुळे अखेर २३ ऑगस्ट रोजी शाळा बंद आंदोलन करण्यात आले.वझर आघाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १ ते ७ वर्ग असून, २२५ पटसंख्या आहे. शाळेसाठी ८ पदे कायमस्वरुपी मंजूर असताना अनेक महिन्यापासून फक्त ६ शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी अनेकवेळा निवेदने देऊन जन आंदोलनही करण्यात आले. परंतु गेंड्याची कातडी पांघरुन बसलेल्या पंचायत समिती व जि.प.वरिष्ठ अधिकार्‍यांनी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. अखेर २३ ऑगस्ट २0१६ रोजी विद्यार्थ्यांंसमवेत शाळा बंद आंदोलन गावकर्‍यांना करावे लागले. साखर झोपेत असलेल्या केंद्रप्रमुख पी.एम.मापारी व गटशिक्षणाधिकारी एम.आर.जाधव यांना उशिरा जाग आल्याने त्यांनी दुपारी १२ वाजता वझर आघावकडे धाव घेतली. गावकर्‍यांसोबत चर्चा करुन १ शिक्षक देण्याचे आश्‍वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले. विद्यार्थ्यांंचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन मंजूर पदे भरण्यात येतील, अशा आश्‍वासनामुळे गावकर्‍यांनी शाळा बंद आंदोलन मागे घेतले.