शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

शाळा बंद आंदोलनाला प्रतिसाद

By admin | Updated: December 13, 2014 00:16 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ४२५ शाळेतील शिक्षक कर्मचा-यांचा सहभाग.

बुलडाणा : संपूर्ण राज्यातील ४५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरविणारा, विद्यार्थ्यांंना त्यांच्या विषयाचे शिक्षक मिळण्याचे अधिकार नाकारणारा तसेच शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची पदे मोठय़ा प्रमाणात कमी करणारा जाचक अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात शिक्षण संस् थाचालक मंडळाच्या वतीने शुक्रवारी १२ डिसेंबर २0१४ रोजी कडकडीत शाळा बंद ठेवण्यात आल्या. याला जिल्ह्यातील शिक्षण संस् थांनी प्रतिसाद देत आपल्या शाळा बंद ठेवल्या.या बंदमध्ये जिल्ह्यातील सुमारे ४५0 पैकी ४२५ शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. जिल्ह्यातील सुमारे ६५00 शिक्षकांपैकी ६ हजार शिक्षकांनीही या बंदला पाठिंबा दर्शवित कामबंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे जिल्हाभरातील शाळांमध्ये शुकशुकाट दिसून आला. या बंदमध्ये जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षक आघाडी, विज्युक्टा, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ सहभागी झाले. या बंद संदर्भात शिक्षण संस् थाचालक मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांंत शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रासंदर्भात अ त्यंत परस्परविरोधी शासन निर्णय काढण्यात येत आहेत. यामुळे शिक्षण व्यवस्था मोडकळीस येत आहे. नियमबाह्यरित्या शाळांची पटपडताळणी करण्यात आली व त्यानुसारच शिक्षकांची संचमान्यताही सदोष पद्धतीने करण्यात आली आहे. या सदोष पद्धतीमुळे राज्यातील सुमारे ४५ हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरविण्यात आले. याशिवाय समायोजन करताना विशिष्ट शाळेतील विषय शिक्षकाची विद्यार्थ्यांंंची गरज लक्षात न घेता केले जात आहे. तसेच आरक्षणासंदर्भातील अनुशेषालाही हरताळ फासला जात आहे. गेल्या दहा वर्षांंपेक्षा जास्त कालावधीपासून शाळांचे वेतनेतर अनुदान दिले गेले नाही.