शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावकर्‍यांच्या सहकार्यातून शाळेचे नंदनवन

By admin | Updated: September 5, 2014 00:24 IST

बोराखेडी येथील शालेय परिसरातसह शाळेचे नंदनवन करून नवा आदर्श निर्माण केला.

मुरलीधर चव्हाण / मोताळाबोराखेडी येथील भिल्ल, वैदु व वडार समाजाच्या पालकांच्या भेटी घेवून गावकर्‍यांच्या मदतीने शालेय परिसरातसह शाळेचे नंदनवन करणारे शिक्षक अनिल कन्हीराम चव्हाण यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. बोराखेडी हे साडेचार हजार लोकवस्तीचे गाव. सन २00४-0५ मध्ये भिल्ल वस्तीमध्ये उभारलेल्या या शाळेत कुठल्याच सुविधा नव्हत्या. त्यात भिल्ल, वडार व वैदु या आदिवासी समाजाचा व्यावसाय मजुरी करणे व दारू गाळणे एवढाच. अशा स्थितीत शाळेबद्दल आपुलकी निर्माण करून आदिवासी प्रवर्गातील वस्तीमध्ये शाळेचे वातावरण आनंददायी व शैक्षणिकदृष्ट्या सुखावह करण्याचे काम अनिल चव्हाण हे सहकारी शिक्षक व गावकर्‍यांच्या मदतीने केले. आज रोजी भिल्ल वस्तीमधील शाळेचा परिसर हिरवागार दिसत असतो.सर्व प्रकाराच्या सुविद्या पाहावयास मिळतात. शाळेमधील बोलक्या भिंतीचा उपक्रम तालुकाभरातील सर्व शाळांसाठी आदर्श ठरला आहे. शाळेचे वातावरण आनंददायी असून शैक्षणिकदृष्टया सुखावह झाल्यामुळे २५८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील १५0 विद्यार्थी हे भिल्ल, वैदु व वडार समाजाचे असून आता अंत्री गावातील ७५ विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. शालेय परिसर हिरवागार करण्यासाठी स्वत: शिक्षक अनिल चव्हाण यांनी सुरूवातीला पाच हजार रूपयाचे झाडे आणून वृक्षारोपण केले होते. वर्षभर शिक्षकांच्या वाढदिवशी एका झाडाचे वृक्षारोपण केले जाते. गावकर्‍यांच्या मंदतीने पिण्याच्या पाण्याचा व संरक्षण भिंतीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे.जि.प. कडून साहित्य व अनुदान मिळेल काय? याची प्रतीक्षा न करता गावातून लोकवर्गणीच्या माध्यमातून शहरी भागाला साजेल व लाजवेल असे साहित्य या शाळेमध्ये खरेदी करून उपलब्ध करून दिले आहे.