संग्रामपूर (जि. बुलडाणा): महाराष्ट्र शासनाने ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमधील उपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाड्या अंतर्गत बालकांना पोषण आहार सुरु केला आहे. मात्र, तालुक्यातील अंगणवाडीमध्ये शालेय पोषण आहार नियमानुसार वितरीत होत नसल्याची परिस्थिती समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील १७९ मोठय़ा अंगणवाड्या आणि १६ मिनी अंगणवाडी आहेत. या अंगणवाडीतील बालकांना बुधवार आणि शुक्रवार या दिवशी केळी आणि अंडी वितरण करण्याचे नियोजीत केले आहे. यामध्ये शाकाहारी मुलांना केळी तर मासांहारी मुलांना अंडी देण्याची तरतूद आहे. मात्र, या अंगणवाडीमध्ये मेनू नुसार पोषण आहार वितरीत केल्या जात नसल्याचे धक्कादाक वास्तव ह्यलोकमतह्णने शुक्रवारी केलेल्या पाहणीत दिसून आले. ह्यलोकमतह्णच्या पाहणीत वरवट बकाल येथील अंगणवाडी क्रमांक २ मध्ये शुक्रवारी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. मात्र, मदतनीस आढळून आल्या नाहीत. तसेच या अंगणवाडीत एकही विद्यार्थी उपस्थित न राहील्यामुळे शालेय पोषण आहार तसाच पडून होता. चांगेफळ खुर्द मधे एकूण २७ बालकांना केळीचे वाटप करण्यात आले. या अंगणवाडीत मेनूतील अंडी गायब असल्याचे दिसून आले. तर शेतखेडा येथील अंगणवाडीमध्ये एकही बालक आढळून आला नाही. संग्रामपूर येथील अंगणवाडी क्रं.९ मध्ये २२ बालकांना अंगणवाडी क्र.६ मध्ये १४ बालकांना अंगणवाडी क्र.८ मध्ये १३ बालकांना केळी व अंडीचे वितरण करण्यात आले. आकोली खुर्द ये थील मिनी अंगणवाडीमध्ये कुणीही आढळून आले नाही. अकोली बु. येथील अंगणवाडीमध्ये ३ बालके उपस्थित होते. मात्र, वरवट बकाल येथील अंगणवाडी क्रमांक २ ही संपूर्णपणे बंद होती. यासंदर्भात बालविकास प्रकल्प विकास अधिकारी एस.एस.शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बालवाडीत मेनू नुसार पोषण आहार वितरीत होत नसल्यास याची चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
शालेय पोषण आहार वितरणात घोळ!
By admin | Updated: August 3, 2015 01:32 IST