डाेणगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळी घरगुती साहित्यासह भाजीपाल्याचे चिन्ह मिळाले हाेते. डाेणगाव ग्रामपंचायतच्या १७ जागांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेदम्यान मतदान प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर केंद्रावरील पंखे आलमारीवर झाकून ठेवावे लागले. मतदान प्रक्रियेदरम्यान पंख्यासह इतर वस्तूंवर पेपर लावून झाकण्याची तालुक्यात चर्चा हाेती.
या निवडणुकीमध्ये जे चिन्ह वापरण्यात आले होते. यापैकी कित्येक चिन्हे ही मतदान केंद्रामध्ये होती. ज्यात छताचा पंखा, आलमारी, शाळेच्या भिंतीवर काढलेले पुस्तक, पोलिसांच्या जवळ शिट्टी यात काहींनी निशाण्यावर आक्षेप नोंदविल्याने काही ठिकाणी छताचा पंखा झाकण्यात आला तर पुस्तकावरसुद्धा पेपर लावून झाकण्यात आले. त्यामुळे निवडणूक विभागाची दमछाक झाली. शिवाजी हायस्कूलचे प्रांगण मोठे असल्याने त्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे पालन झाले. मात्र, जि. प. मराठी शाळा,कन्या शाळा,उर्दू शाळा या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचे पालन झाले नाही. वाॅर्ड क्रमांक एकमधील बॅलेट युनिट व वाॅर्ड क्रमांक ३ मधील बॅलेट युनिटमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने ते बदलण्यात आले होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी निवडणूक विभागासोबत पोलीस प्रशासन देखील सज्ज होता. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली जायगुडे हे तळ ठोकून होत्या तर ठाणेदार दीपक पवार व त्यांच्या पथकाने चाेख बंदाेबस्त ठेवला हाेता. सहा वॉर्डात १७ जागांसाठी ५५ उमेदवार रिंगणात होते. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली डोणगाव ग्रामपंचायतीसाठी या वेळेस ५५ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम बंद झाले. यामध्ये १३ अपक्ष तर ४२ विविध पॅनलच्या उमेदवारांचा समावेश आहे. वाॅर्ड क्रमाक एक २५२३ पैकी १६१६ मतदारांनी आपले कर्तव्य बजावले तर वाॅर्ड क्रमान दोनमध्ये २३८९ मतदार होते. यापैकी १६८१ मतदारांनी मतदान केले. वाॅर्ड क्रमांक ३ मध्ये १६२७ मतदार होते. त्यापैकी १२७४ मतदारांनी मतदान केले. वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये २५१० मतदार आहे. त्यापैकी १७४९ मतदारांनी मतदान केले. वाॅर्ड क्रमांक ५ मध्ये २४०९ पैकी महिला १८९४ मतदान केले. वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये २२६८ मतदार होते तर १८४२ जणांनी मतदान केले.