शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद; बालक-पालकांचे मानसिक आरोग्य हरवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:38 IST

बुलडाणा : गत दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुलांना विविध छंद जडले आहेत. शाळा नाही, अभ्यास नाही. त्यामुळे मुलांचे ...

बुलडाणा : गत दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुलांना विविध छंद जडले आहेत. शाळा नाही, अभ्यास नाही. त्यामुळे मुलांचे हट्ट पुरविताना पालकांची दमछाक होत आहे. दिवस निघताच मुलांना हाती मोबाईल हवा, अन्यथा ते चिडचिड करतात. यामुळे पालकही चिंतातुर झाले आहे. सवयी बदलल्याने आरोग्यावर परिणाम होत असल्याचे जाणवत आहे.

कोरोनामुळे शिक्षणाचे तीनतेरा झाले. दिनचर्येत बदल झाला. ८० ते ९० टक्के मुलांचे मैदानी खेळ थांबले आहे. लॅपटॉप वा टॅबवर ऑनलाईन असलेल्या मुलांना मज्जाव केल्यास ते रागावतात, अशा तक्रारी पालकांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे नोंदविल्या आहेत. मुले दिवसभर मोबाइल बघतात. त्यामुळे डोळ्यांचे आजारही वाढले असून, चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

पालकांच्या समस्या...

कोरोना काळात शाळा बंद असल्याने मुले बाहेर पडू नये, यासाठी घरातच टीव्हीसमोर बसून राहण्याची सक्ती केली होती. आता ही सवय मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे. मुलांना डोळ्यांचे आजार, डोकेदुखीचे त्रास वाढले आहे. मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. सतत टीव्हीसमोर बसत असल्याने डोळ्यांचा आजार, मानसिक आरोग्य जडले आहे.

मुलांच्या समस्या...

शहरी भागात जवळपास सर्व पालकांनी ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल खरेदी केला आहे. मात्र, मुले ऑनलाईन शिक्षणाऐवजी कार्टून फिल्म, गेम खेळतात.

पुस्तकाऐवजी मुलांच्या हाती मोबाईल आल्याने मुलांच्या सवयीत प्रचंड बदल झाला आहे. मानसिक आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. आवडी-निवडी पूर्ण करताना पालक त्रस्त झाले आहे.

मैदानी खेळ बंद झाले. त्याऐवजी रमोबाईल टीव्हीने जागा घेतली आहे. शाळा बंद असल्याने मित्र, सवंगडी हरविल्याचे चित्र आहे.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

शाळा बंद असल्याने लहान मुलांवर त्याचे परिणाम हाेत आहे़ पालकांनी मुलांना वेळापत्रक ठरवून द्यावे़ अभ्यास, गृहपाठ आणि खेळण्यासाठीही वेळ द्यावा़ ताण वाढल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडेपणा वाढला. याचा परिणाम पालकांवरही हाेत आहे़

डाॅ़ विश्वास खर्चे, मानसाेपचार तज्ज्ञ, बुलडाणा

६ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांना मानसिक आजाराचे रुग्ण वाढले आहेत. पालक तशा मुलांच्या समस्या घेऊन येत आहेत. हा सर्व प्रकार लहान मुलांच्या सवयी बदलल्याने घडत आहे.

- किशोर वाघ, समुपदेशक, खामगाव.