शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शहरांमध्येही वाजणार शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST

बुलडाणा : काराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागात ८वी ते १२वीचे तर ग्रामीण भागात पाचवी ते सातवीच्या शाळा ४ ...

बुलडाणा : काराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागात ८वी ते १२वीचे तर ग्रामीण भागात पाचवी ते सातवीच्या शाळा ४ ऑक्टाेबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याविषयी मार्गदर्शक सूचनाही शाळांसाठी शासनाने जारी केल्या आहेत. त्यामुळे, दीड वर्षानंतर प्रथमच शहरी भागात शाळेची घंटा वाजणार आहे.

काेराेनामुक्त झालेल्या गावांमध्ये ग्राम समितीच्या शिफारशीवरून शासनाने इयत्ता आठवी ते १२वीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात ९१९ पैकी ४८७ शाळा सुरू आहेत. काेराेनाच्या धास्तीने मुलांना पालकांनी शाळेत पाठविले नसल्याचे चित्र आहे. दुसरी लाट ओसरत असल्याने शासनाने अनलाॅक प्रक्रिया सुरू केली आहे. दीड वर्षापासून बंद असलेल्या शहरी भागातील शाळा सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घाेषणा शासनाने केली आहे. शहरी भागात ८वी ते १२वीच्या शाळा सुरू हाेणार असून, ग्रामीण भागात पाचवी ते सातवीचे वर्गही भरणार आहेत. काेराेनाविषयक नियमांचे पालन करून या शाळा सुरू हाेणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील ४८७ शाळा आहेत सुरू

सध्या काेराेनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील ४८७ शाळा सुरू आहेत. एकूण ९१९ पैकी अर्ध्या शाळा सुरू झालेल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच आहे. जिल्ह्यात आठवी ते बारावीचे एकूण १ लाख ३१ हजार ७०७ विद्यार्थी आहेत. त्यापैकी १९ हजार ७५३ विद्यार्थीच उपस्थित राहत आहेत. सर्वाधिक चिखली तालुक्यात ९१ शाळा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर मेहकर तालुक्यात ७७ शाळा सुरू झालेल्या आहेत.

अशा आहेत मार्गदर्शक सूचना

प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करावे.

विद्यार्थ्यांचे टेम्परेचर नियमितपणे तपासावे.

शक्य असल्यास इच्छुक डाॅक्टर पालकांची मदत घ्यावी.

सर्व शाळा आराेग्य केंद्राशी जाेडाव्यात.

हेल्थ क्लिनिकमध्ये स्थानिक आराेग्य केंद्रातील डाॅक्टर, परिचारिकांची मदत घ्यावी.

ही घ्यावी काळजी

मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्राेत्साहित करावे.

स्कूलबसमध्ये एका सीटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करावा.

बसमध्ये चढताना, उतरताना वाहन चालक, विद्यार्थ्यांनी सॅनिटायझरचा वापर करावा.

शहरी भागातील इयत्ता आठवी ते १२वी व ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याविषयीची तयारी पूर्ण केली आहे़ बहुतांश शिक्षकांनी काेराेना लसीचे दाेन्ही डाेस घेतले आहेत. येत्या ४ ऑक्टाेबरपासून शहरी भागातही शाळा सुरू हाेणार आहेत.

सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प. बुलडाणा

जिल्ह्यातील एकूण ८वी ते १२वीच्या शाळा

९१९

सध्या सुरू असलेल्या शाळा

४८७

एकूण ८वी ते १२वीचे विद्यार्थी

१,३१,७०७

सध्या उपस्थित असलेले विद्यार्थी

१९,७५३