शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याची दहशत कायम!

By admin | Updated: May 16, 2016 01:23 IST

वडी शिवारात वनविभागाने लावले तीन पिंजरे.

नांदूरा : राष्ट्रीय महामार्गाला लागुनच असलेल्या वडी शिवारातील पाईप फॅक्टरीत मागील आठ दिवसांपासून पाईपमध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तिन पिंजरे लावली असून दिवस रात्र कर्मचारी तैनातीत आहेत. मात्र वेळोवेळी पाईपांच्या मधून दिसणार्‍या बिबट्याला पकडण्यात अद्यापही वनविभागाला यश न आल्याने बिबट्याची दहशत वडी परिसरातील शेतकरी, मजुर व नागरीकांमध्ये कायम आहे. वडी शिवारातील पाईप फॅक्टरीतील मजुरांना ८ मे च्या संध्याकाळी पाईपवर बसलेला बिबट्या दिसला त्याबाबत तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली होती. मात्र कर्मचारी आले व शोधाशोध करुन निघून गेले. त्यानंतर सतत बिबट्याचा मुक्त संचार फॅक्टरी परिसरात आहे. याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने प्रकाशित केल्यानंतर ११ मे रोजी वनविभाग सतर्क झाला व त्यांनी आजरोजी तीन पिंजरे बिबट्याला पकडण्यासाठी पाईप फॅक्टरी परिसरात लावले आहेत. त्यापैकी एका पिंजर्‍यात बकरी तर दोन मध्ये प्रत्येक एक कोंबडी ठेवण्यात आली आहे. दिवसा तीन वन कर्मचार्‍यांचे पथक तर रात्री पाच कर्मचारी असलेले पथक परिसरात तैनात असते. १५ मे च्या दुपारी दोन कर्मचारी वनसेवक बज्जर व सपकाळ कार्यरत दिसून आले. तर या भागाचे वनपाल रघुवंशी हे मागील दोन दिवसांपासून नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचा फोन बंद अवस्थेत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी.कोंडावर हे संध्याकाळी पाईप फॅक्टरी परिसराला भेट देवून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्नरत आहेत. बिबट्या अद्यापही वनविभागाच्या पिंजर्‍यात अडकला नसला तरी त्याचा मुक्त संचार परिसरात कायम आहे.