शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अंगणवाडीतील लाभार्थ्यांचा पूरक पोषण आहार फस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 11:43 IST

Khamgaona News आहार वितरणात लाभार्थ्यांना कमी तेलाचा पुरवठा करुन तब्बल ३३ लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील २,७१२ अंगणवाड्यांमधील ०३ ते ०६ वर्ष वयोगटातील बालकांना पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहार वितरणात लाभार्थ्यांना कमी तेलाचा पुरवठा करुन तब्बल ३३ लाख रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. सहा पुरवठा आदेशातील एकूण ५ लाख ६१ हजार ७२ लाभार्थ्यांना प्रति ०.०४५ ग्रॅमप्रमाणे २५,२४८.२४० ग्रॅम तेल कमी देण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. या तेलाची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ३२ लाख ८२ हजार २७१.२० रुपये असून, हे तेल मुरले तरी कुठे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील अंगणवाडीतील पोषण आहार मालाची तपासणी करत आमदार संजय रायमूलकर यांनी आहार वितरणातील घोळ उघडकीला आणला होता. याप्रकरणी १४ सप्टेंबर २०२०च्या पत्राद्वारे सविस्तर तक्रारही जिल्हा प्रशासनाकडे नोंदवली होती. या तक्रारीत पुरवठा करत असलेल्या स्थानिक महिला संस्थांना डावलून कोविड-१९च्या आड आणि नियमाविरूध्द महाराष्ट्र कंझ्युमर फेडरेशनला पुरवठा कंत्राट देण्यात आले. मात्र, फेडरेशन स्वत: या पोषण आहाराचा पुरवठा करत नसून,  कमिशन तत्वावर उपकंत्राटदारांमार्फत पुरवठ्याचे काम करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे तसेच पुरवठा केलेल्या पोषण आहारातील माल निकृष्ट दर्जाचा तसेच कमी वजनाचा असल्याने, फेडरेशनने शासनाची आणि लाभार्थ्यांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक कागदोपत्री सिद्ध होत असल्याने, पुरवठादार महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कंझ्युमर फेडरेशनविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार रायमूलकर यांनी केली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष करत याप्रकरणी साधी चौकशीही केली नाही. ही चौकशी आणि कारवाई दडपल्यानेच पोषण आहार वितरणातील  घोटाळ्याला बळकटी मिळत असल्याचे उघड होत आहे.

ग्रॅमऐवजी ५०० मिलिलीटर तेलाचा पुरवठा शासन आदेशानुसार प्रत्येक लाभार्थीला ५०० ग्रॅम तेलाचे पाकीट पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र, अधिकाऱ्यांशी संगनमत करून ५०० ग्रॅमऐवजी ५०० मिलिलीटरच्या पाकिटांचा पुरवठा केला जात आहे.  त्यामुळे प्रत्येक पाकिटामागे १० टक्के कमी तेलाचा पुरवठा होत असून, देयके सादर करताना शासन आदेशानुसार पुरवठा झाल्याचे भासविण्यात येत आहे.

पूरक पोषण आहार वितरणातील घोळाची माहिती मिळाल्यानंतर अंगणवाडींना भेट दिली. यावेळी पोषण आहारात अनियमिता आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे रितसर आणि पुराव्यानिशी तक्रार केली आहे. मात्र, नियम डावलून जिल्हा प्रशासनातील अधिकारी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी शासन आणि लाभार्थ्यांचे नुकसान करत आहेत.- संजय रायमूलकर, आमदार, मेहकर विधानसभा.

टॅग्स :khamgaonखामगाव