शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँकेच्या टॉवरवर वीज कोसळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:57 IST

पळशी बु. : येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या टॉवरवर वीज कोसळल्याने बँकेतील यूपीएस मशीन व कॉम्प्युटर संच खराब झाल्यामुळे सोमवार १८ सप्टेंबरपासून बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी खातेदारांची मोठी तारांबळ होत आहे.

ठळक मुद्देबँकेतील यूपीएस मशीन व कॉम्प्युटर संच खराब बँकेचे सर्व व्यवहार ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कपळशी बु. : येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या टॉवरवर वीज कोसळल्याने बँकेतील यूपीएस मशीन व कॉम्प्युटर संच खराब झाल्यामुळे सोमवार १८ सप्टेंबरपासून बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी खातेदारांची मोठी तारांबळ होत आहे.खामगाव तालुक्यात येत असलेल्या पळशी बु. या परिसरात  रविवार १७ व १८ सप्टेंबर रोजी सायं. ६ वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यात येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या टॉवरवर अचानक वीज कोसळल्याने बँकमधील मुख्य व्यवहार करण्याचे यूपीएस मशीन व कॉम्प्युटर संचामध्ये बिघाड झाला. त्यामुळे सोमवारपासून येथील बँकेतील बँक खातेदारांचे सर्व व्यवहार हे ठप्प झाले. पळशी बु. येथील भारतीय स्टेट बँक या शाखेला या परिसरातील पळशी बु., पळशी खुर्द, संभापूर, उमरा, लासुरा, हिंगणा, शेंद्री, कदमापूर, लोणी, दस्तापुर इत्यादी गावी जोडलेली असून, चितोडा, हिंगणा, कारेगाव व बाळापूर येथील अनेक खातेदारांची खाती याच बँकेत  काढण्यात आली; मात्र गेल्या सोमवारपासून या बँकेचे व्यवहार ठप्प झाल्यामुळे बँक ग्राहक दररोज पैसे काढणे व टाकणे याकरिता पायपीट करीत आहेत. यामुळे येथील बँक खातेदारांना याचा मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तरी भारतीय स्टेट बँकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी या बाबीची दखल घेऊन त्वरित बँक व्यवहार सुरळीत करून बँक खातेदारांची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी पळशी बु. या परिसरातील बँक खातेदाराकडून केल्या जात आहे. 

रविवारी बँकेच्या टॉवरवर वीज कोसळल्याने बँकेतील यूपीएस मशीन तसेच कॉम्प्युटर संचामध्ये मोठा बिघाड झाला. परिणामी ते नवीन बसवणे गरजेचे असून, त्याला आणखी दोन-चार दिवस लागतील; पण बँक हे काम जेवढय़ा लवकर करता येईल तेवढय़ा लवकर करण्याचा प्रयत्न करीत आहे.- अमोल घोलप,भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक, पळशी बु.