शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

विद्यार्थ्यांसाठी आता ‘नमस्कार’  म्हणा आणि स्वाध्याय सोडवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 17:26 IST

Education Sector News विद्यार्थ्यांना ‘नमस्कार अथवा हॅलो’ असे लिहून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : हल्ली मोबाइलवरूनच हाय, हॅलो, नमस्कार सुरू असतात; परंतु आता महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने मोबाइलद्वारे स्वाध्याय योजना सुरू केली असल्याने हाच नमस्कार विद्यार्थ्यांना स्वाध्याय सोडविण्यासाठी मित्र बनून मदतीला आला आहे. विद्यार्थ्यांना ‘नमस्कार अथवा हॅलो’ असे लिहून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार शाळांमध्ये हा उपक्रम राबविल्या जात आहे. संवाद व संपर्क प्रभावीपणे साधणारे माध्यम मोबाइल आहे. कोरोनाच्या प्रभावाने प्रत्येक क्षेत्रात बदल झाला. पहिलीच्या मुलांपासून ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या हातात मोबाइल, संगणक, लॅपटॉप आला आहे. ही माध्यमे आता अभ्यास करण्याचे केंद्रबिंदू बनले आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करण्याला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनीदेखील चालना दिली आहे.पहिली ते दहावीपर्यंत मोबाइलद्वारे स्टुडंट व्हॉट्सॲप बेस डिजिटल होम असेसमेंट या योजनेतून विद्यार्थ्यांना प्रश्न प्राप्त होणार असून, मुलांना स्वाध्याय करण्यास प्रेरित करणारा हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना क्रियाशील बनविणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अगोदर विद्यार्थ्यांना लिंकद्वारे व्हाॅटसॲप ग्रुपशी कनेक्ट व्हावे लागेल.  त्यानंतर हॅलो किंवा नमस्कार टाइप करून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान तसेच या उपक्रमाची माहिती व व्याप्ती वाढवणे हा हेतू आहे. शिक्षक, पालक विद्यार्थ्यांच्या सध्याच्या स्थितीबद्दल नियमित माहिती मिळू शकणार आहेत. त्यामुळे शिक्षक-पालक व विद्यार्थ्यांना सोईचे होणार आहे. विद्यार्थी, पालकांनी याचा लाभ घेणे आवश्यक आहे.

अशी होणार ऑनलाइन चाचणी  सध्या मराठी भाषा, सेमी इंग्रजी माध्यमासाठी मराठी, गणिताचे विषय सुरू करण्यात आले आहेत. स्वाध्याय उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना समाजमाध्यमांद्वारे दर आठवड्याला विषयनिहाय प्रश्न दिले जाणार आहेत. n त्यानंतर ऑनलाइन चाचणी होईल. ही प्रक्रिया दीर्घकालीन व नियमित चालणार आहे. विद्यार्थ्यांच्या फोनवर प्रश्नमंजूषा घरच्या घरी उपलब्ध करून दिली जाईल.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNanduraनांदूरा