शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सावखेड तेजन - चिंचोली रस्ता गेला खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:32 IST

किनगाव राजा : येथून जवळच असलेल्या मेहकर जालना राष्ट्रीय महामार्गालगत सावखेड तेजन ते चिंचोली या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली ...

किनगाव राजा : येथून जवळच असलेल्या मेहकर जालना राष्ट्रीय महामार्गालगत सावखेड तेजन ते चिंचोली या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर माेठमाेठे खड्डे असल्याने, या त्यावरून वाहने तर दूरच पायी चालणेही कठीण झाले आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही, त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.

सावखेड तेजन ते चिंचोली जहागीर हा रस्ता पुढे थेट मराठवाडा हद्दीला जोडला जातो. या रस्त्यावर सावखेड तेजन, हणवतखेड, महारखेड, खामगाव, वाघोरा, सुलजगाव, चिंचोली जहागीर, पुढे पास्टा, सोनदेव शेवलीमार्गे वाटूर फाटा राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो. अनेकांना रोज बाजारपेठ आणि आपल्या दैनंदिन, तसेच सरकारी कामासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, वीज कार्यालय इत्यादी महत्त्वाच्या कामासाठी रोज सिंदखेड राजा येथे येणे-जाणे करावे लागते. गावामध्ये गंभीर रुग्ण असेल, तर उपचाराकरिता तातडीने जालना येथे दवाखान्यात जावे लागते, परंतु मागील दहा ते पंधरा वर्षांपासून या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले नाही.

ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष

या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. मात्र, या मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. या रस्त्यावरील खड्ड्यामुळे अनेक जणांचा अपघात घडला असून, अनेकांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

सावखेड तेजन ते चिंचोली जहाँगीर या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक वेळा लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाला निवेदने दिली आहेत. हा रस्ता लवकर होणे गरजेचे आहे, अन्यथा एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गजानन घुले, भाजप तालुका अध्यक्ष, सिंदखेड राजा.