शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पैशाची बचत करताय. पाणी आणि विजेचे काय ?

By admin | Updated: October 29, 2014 23:01 IST

आज काटकसर दिन : नागरिकांनी संकल्प घेण्याची गरज

बुलडाणा : पैशाची बचत करण्यासाठी प्रत्येकजण जीवाचा आटापिटा करतो. भविष्याची तरतूद म्हणून कमावलेल्या रकमेतून काही रक्कम शिल्लक टाकण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडून केला जातो; मात्र वर्तमान आयुष्य सुखद करणार्‍या पाणी आणि विजेच्या बचतीबाबत सारेच निष्काळजी असतात. पैशाची बचत करण्यासाठी काटकसर केली जाते; मात्र पाणी आणि वीज वाचवण्यासाठी काटकसर होत नाही. आज जागतिक काटकसर दिनानिमित्त प्रत्येक नागरिकाने पाणी आणि विजेचा वापर काटकसरीने करण्याचा संकल्प केला तर वर्तमानासोबत भविष्यही अधिक सुखद होईल. बुलडाणा शहराच्या दृष्टीने पाणी आणि विजेचा वापर, मागणी आणि पुरवठा याचा विचार केला तर या बाबतीत काटकसर करणे अत्यावश्यक असल्याची बाब समोर आली आहे. बुलडाणा शहरात नगरपालिकेच्या हद्दीमध्ये एकूण १५ हजार ९२७ घरे आहेत. या प्रत्येक घरामध्ये नगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो; मात्र प्रत्यक्षात केवळ नऊ हजार ५९0 एवढय़ाच घरांमध्ये नळजोडणी आहे. उर्वरित सहा हजार ३३७ घरांचा पाणीपुरवठा हा सार्वजनिक नळावरून किंवा अवैध नळ जोडण्यावरून होतो, यात शंका नाही. बुलडाणा शहराला दररोज ९0 लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. यासाठी तीन दिवसाआड पाणी दिले जाते. अवैध नळ जोडणी, लिकेजेस यामुळे पाण्याचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर होतो. हे टाळण्यासाठी अशा जोडण्या वैध केल्या तर पाण्याची बचत होईल. तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरीही सर्वसामान्यांचा पाणीवापर हा काटकसर व बचतीचा नाही, हे सर्वच मान्य करतील. गेल्या उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करावा लागल्यानंतर गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली व पाण्याची साठवण क्षमता वाढली. सुदैवाने यावर्षी पाऊसही पुरेसा झाला, त्यामुळे पाण्याच्या दुष्काळाचे सावट नक्कीच तीव्र राहणार नाही. पाण्याचा वापर काटकसरीने केला नाही तर उपलब्ध पाणीही जास्त दिवस पुरणार नाही.