शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

वन्य प्राण्यांसाठी ज्ञानगंगा अभयारण्यात ‘साटण लोटण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 10:47 IST

Gyanganga Sanctuary पाणवठ्याच्या जवळ मीठ व माती कालवून साटण लोटण करण्यात येते.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : उन्हाळ्यात ज्ञानगंगा प्रकल्पातील पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात येत असून, साटण लोटण करण्यात येत आहे. पाणवठ्याच्या जवळ मीठ व माती कालवून साटण लोटण करण्यात येते.  प्राण्यांचे पगमार्क ओळखण्यासाठी व उन्हाळ्यात थंडावा राहण्यासाठी साटण लोटण करण्यात येते.   बुलडाणा जिल्ह्यात २०५ चौरस किमी परिसरात ज्ञानगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, हरिण, नीलगाय, रानडुकर आदी प्राणी आढळतात. तसेच मोर, चिमणी, कावळा, पोपट, तितर, बटर यासह अनेक पक्षी आहेत. बुलडाणाखामगाव अशा दोन परिक्षेत्रात ज्ञानगंगा अभयारण्य पसरले आहे. उन्हाळ्यात या अभयारण्यातील नैसर्गिक पाणवठे सुकतात. त्यामुळे वनविभागाच्यावतीने  तयार करण्यात आलेल्या पाणवठ्यांमध्ये वन्यप्राण्यांसाठी पाणी टाकण्यात येते. ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीव विभागाच्यावतीने ८२ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्याचा कंत्राट देण्यात आला असून, नियमित पाणी टाकण्यात येत अ सल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासोबतच या सर्व पाणवठ्यांच्या बाजूला साटण व लोटण करण्यात येत आहे.  याबाबत माहिती देताना वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी सांगितले, की  पाणवठ्याच्या चहूबाजूने माती व मीठ कालवून ठेवण्यात येते. या ठिकाणी प्राणी लोळतात. त्यामुळे त्यांना उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळतो. तसेच पाणवठ्याच्या परिसरात रेती व माती टाकून ओली करण्यात येते. वन्यप्राण्यांचे पगमार्क यावर उमटत असून, कोणता प्राणी पाणी पिण्यासाठी आला होता, याची माहिती मिळते. त्यामुळे दरवर्षी पाणवठ्यांच्या बाजूला साटण लोटण करण्यात येत असल्याचे सुरवसे यांनी सांगितले.

ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या पाणवठ्यांमध्ये नियमित पाणी टाकण्यात येत असून, साटण लोटण करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यापासून पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात येत आहे. तसेच प्राण्यांना उन्हापासून दिलासा मिळावा व त्यांचे पगमार्क ओळखता यावे यासाठी साटण लोटण करण्यात येत आहे. - मयूर सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग, बुलडाणा.  

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यbuldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव