शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलांना दाखवला जातो सासर-माहेरचा रस्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:27 IST

बुलडाणा : गर्भवती महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी आय-डी  क्रमांक अनिवार्य करण्यात आला असून, त्यासाठी जिल्हा सामान्य  रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंद करणे आवश्यक  आहे; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्यास नियमांवर बोट  ठेवून या महिलांना सासर किंवा माहेरचा रस्ता दाखवला जात  आहे. या नियमामुळे   सोनोग्राफीसाठी गर्भवती महिलांची हेळसांड  होत  आहे.

ठळक मुद्देसोनोग्राफीसाठी आय-डी क्रमांकाने वाढवली डोकेदुखीगर्भावस्थेत पत्करावा लागतो प्रवासाचा धोकाअनेक गर्भवती महिलांची सोनोग्राफी बाकीच! 

ब्रह्मनंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गर्भवती महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी आय-डी  क्रमांक अनिवार्य करण्यात आला असून, त्यासाठी जिल्हा सामान्य  रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंद करणे आवश्यक  आहे; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्यास नियमांवर बोट  ठेवून या महिलांना सासर किंवा माहेरचा रस्ता दाखवला जात  आहे. या नियमामुळे   सोनोग्राफीसाठी गर्भवती महिलांची हेळसांड  होत  आहे.    सोनोग्राफीच्या माध्यमातून गर्भपात, स्त्रीभ्रूण हत्या किंवा लिंगभेद  चाचण्यावर आळा घालण्यासाठी माता संरक्षण कार्ड व आधार  कार्डची झेरॉक्स असल्याशिवाय गर्भवती स्त्रीची सोनोग्राफी  कायद्यानुसार करता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी  जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रांना दिले आहेत. त्यामुळे माता  संरक्षण कार्ड म्हणजे आय-डी क्रमांक असल्याशिवाय गर्भवती  महिलांची सोनोग्राफी कुठल्याच सोनोग्राफी केंद्रावर करण्यात येत  नाही. सदर क्रमांक जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा प्राथमिक  आरोग्य केंद्रातून प्राप्त होतो. गर्भवती महिला आय-डी  क्रमांकासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्यास त्यांना त्या जेथे  राहतात (सासर-माहेर) तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर  जाण्याचा सल्ला दिला जातो. जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीनिमित्त  राहणार्‍या कुटुंबातील गर्भवती महिलांना आय-डी क्रमांकासाठी  गर्भावस्थेत सासरी किंवा माहेरी जाणे शक्य होत नसल्यामुळे त्यांची  मोठी अडचण होत आहे.  

गर्भावस्थेत पत्करावा लागतो प्रवासाचा धोकागर्भवती महिलांनी प्रवास टाळावा, असा सल्ला डॉक्टरांकडून  सुरुवातीपासूनच दिला जातो;  मात्र सोनोग्राफी करण्यासाठी  लागणार्‍या आय-डी क्रमांकाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय  किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहेरगावच्या गर्भवती महिलांची  नोंद करून घेतल्या जात नाही. त्यामुळे शहर किंवा जिल्ह्याच्या  ठिकाणी नोकरीनिमित्त राहणार्‍या गर्भवती महिलांना दुरवर  असलेल्या सासर किंवा माहेरला जाण्याशिवाय पर्याय उरत नाही.  त्यामुळे सोनोग्राफीच्या आय-डी क्रमांकासाठी  काही गर्भवती  महिलांना गर्भावस्थेत प्रवासाचा धोका पत्करावा लागत आहे.

अनेक गर्भवती महिलांची सोनोग्राफी बाकीच! गर्भवती महिलांना दोन ते तीन महिन्यातून एकदा सोनोग्राफी  करण्याचे डॉक्टरांकडून सांगितल्या जाते; मात्र बाहेरगावच्या  महिलांना सोनोग्राफीसाठी आय-डी क्रमांक मिळविणे अवघड जा त असल्याने अनेक गर्भवती महिलांची सोनोग्राफी करणे बाकी  राहत आहे. एखाद्या गर्भवती  महिलेची तत्काळ सोनोग्राफी  करायची असल्यास त्यांनाही विविध अडचणींचा सामना करावा  लागतो.

आर.सी.एच.पोर्टल आय-डी नंबर असल्याशिवाय गर्भवती  महिलांची सोनोग्राफी होत नाही. गर्भवती महिला जेथे राहतात ते थील प्राथमिक आरोग्य केंद्रातून आय-डी नंबर प्राप्त करावा.- डॉ.सरिता पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा. -